बुद्धिबळ हा विचारशक्तीला धार लावणारा खेळ-सौ रेणुका कोल्हे
Chess is a game that sharpens the mind – Ms. Renuka Kolhe
कोपरगावात बुद्धिबळ स्पर्धेची पर्वणी, सलग चौथे वर्ष
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन 3Aug 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: बुद्धिबळ या खेळात, तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा अंदाज घेऊन त्यावर मात करण्यासाठी योजना आखावी लागते, ज्यामुळे तुमच्या मेंदूला सतत विचार करावा लागतो. थोडक्यात विचारशक्तीला धार लावणारा एक मानसिक व्यायाम असल्याचे प्रतिपादन स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ. रेणुका कोल्हे यांनी केले.
शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी संत जनार्दन स्वामी आश्रम पुणतांबा फाटा येथे विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस-स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी सौ रेणुका कोल्हे बोलत होत्या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.

सौ रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या की,हो, बुद्धिबळ खेळल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते, तसेच बौद्धिक क्षमता वाढते, आधुनिक काळात तरुणाईला संतुलित निर्णयक्षमता आणि संयम शिकवणारा हा खेळ प्रत्येकाने आत्मसात करावा. या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर संधी मिळत असल्याने येथील खेळाडूं देश आणि जागतिक पातळीवर चमकावा असे विवेक कोल्हे यांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
युवानेते विवेक कोल्हे यांच्या सक्रिय पाठबळ,व पुढाकारामुळे कोपरगावातील बुद्धिबळ चळवळीला नवीन दिशा लाभली आहे. स्पर्धेच्या आयोजनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिसांची योजना, तसेच मुलींना स्वतंत्र गट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा एकूण ६४ रोख व १३२ चषकांचे बक्षिसवाटप करण्यात येणार असून, ११, १४, १९ वर्षांखालील व खुला असा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे अहमदनगर, नाशिक व छ. संभाजीनगर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र बक्षिसं, तसेच कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनाही प्रोत्साहनपर बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. सागर गांधी (सोलापूर) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्बिटर स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत.
लायनेस क्लब चे अध्यक्ष अंजली थोरे, एसटी कामगार संघटना सचिव संजीव गाडे, कोपरगाव तालुका क्रीडा समिती धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, राजेंद्र कोळपकर आदीसह खेळाडू, प्रशिक्षक,मान्यवर उपस्थित होते.
Post Views:
52





