स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पूर्वी उद्धव ठाकरे शिवसेना ला मोठा धक्का! माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे राष्ट्रवादीत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पूर्वी उद्धव ठाकरे शिवसेना ला मोठा धक्का! माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे राष्ट्रवादीत

Big blow to Uddhav Thackeray Shiv Sena before local body elections! Former taluka chief Shivaji Thackeray joins NCP

कोल्हे गटाच्या ग्रामपंचायत सदस्याच्या  हाती घड्याळ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 6Aug19.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीपूर्वी  राजकीय खळबळ उडाली आहे. माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने शिवसेना (उबाठा) ला  मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीत सामील झालेल्यांमध्ये कोल्हे गटाचे जेऊर पाटोदा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गीते यांचा समावेश आहे.

या सर्व नेत्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी  स्वागत यांनी केले. यावेळी चारुदत्त सिनगर, मंदार पहाडे  हे देखील यावेळी उपस्थित होते.

 आमदाराची आशुतोष काळे ‌म्हणाले की, या  पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश   मतदार संघात केलेला विश्वास त्यांना भावला असल्याचे दर्शवितो त्यांनी असेही म्हटले की, या प्रवेशामुळे मतदारसंघात पक्षाचे संघटन आता आणखी मजबूत होईल. याचा फायदा होऊ घातलेल्या भविष्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत होईल.

कोपरगाव मतदार संघात मागील पाच वर्षात सर्वसामान्य जनतेपर्यंत नजरेत भरणारा विकास पोहोचविला त्यांच्या विकासावर भुमुख कार्यशैलीमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांबरोबर  पदाधिकाऱ्यांचे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात जोरात इनकमिंग सुरु आहे. हि इनकमिंग नियमितपणे सुरूच असून आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवशी कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेच्या (उबाठा गट) त माजी तालुकाप्रमुख व आपल्या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला तर  कोल्हे गटाचे जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गीते यांनी कोल्हे गटाला सोडचिट्ठी देत हातात घड्याळ घेतले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page