केंद्रीय रस्ते निधीतून ‘झगडे फाटा ते तळेगाव फाटा’ रस्त्याची मागणी; आमदार काळेंनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट

केंद्रीय रस्ते निधीतून ‘झगडे फाटा ते तळेगाव फाटा’ रस्त्याची मागणी; आमदार काळेंनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट

Demand for ‘Zagade Phata to Talegaon Phata’ road from Central Road Fund; MLA Kale meets Minister Nitin Gadkari

दिल्लीत निवासस्थानी गडकरींची भेट अजित पवारांचे दिले पत्र

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 8Aug18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते तळेगाव फाटा या रस्त्यासाठी निधी  द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही दिल्लीत  प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे  केली आहे. शिर्डी कडून जाणारी वाहतूक वळविल्यामुळे अवजड वाहनाने हा रस्ता खचल्याने या रस्त्याच्या करण्यासाठी  निधी द्या, अशी मागणी केली असून या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुढाकार घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

झगडे फाटा ते तळेगाव मार्ग

शिर्डी श्री साईबाबा शिर्डी सुरक्षेच्या दृष्टीने

जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साईबाबा देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम व उत्सव सुरु असतात. त्या उत्सवा वेळी एन.एच.७५२ जी वरून शिर्डीकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाटा मार्गे याच झगडे  फाटा-वडगाव पान फाटा रस्ता अर्थात राज्यमार्ग ६५ वरून मागील अनेक वर्षापासून वळविली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असून  या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता खराब होत आहे.

झगडे फाटा ते कोपरगाव तालुका हद्दीपर्यंत या रस्त्यासाठी आणलेल्या दहा कोटी निधीतून या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आली होती. हा राज्यमार्ग ६५ मार्गे जाणारा रस्ता हा त्या भागातील एक महत्त्वाचा मार्ग असून तो जवळपास २५ ते ३० गावांना जोडतो. वाहतूक, स्थानिक प्रवास आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग एक महत्त्वाचा दुवा असल्याने जास्त वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असून  या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता खराब होत आहे. याबाबत मागील महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी शुक्रवारी (दि.०८) रोजी पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे निदर्शनास ही बाब आणली.व  राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी देखील रस्त्याच्या दुरुस्तीबाबतचे दिलेले पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांना दिले.

या रस्त्याचे महत्त्व आणि दुरुस्ती आणि दर्जोन्नतीची गरज लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत आवश्यक निधी लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेला  सकारात्मक प्रतिसाद बघता  लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी व आ.आशुतोष काळे यांच्या झालेल्या भेटीवरून दिसून येत आहे.

  चौकट
पाठपुरावा करणारा आमदार आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मंत्री 

पहिल्या पंचवार्षिकला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव मतदार संघासाठी ३हजार‌ कोटीचा निधी दिला मात्र यासाठी प्रश्न सोडविण्यासाठी किती आणि कसा पाठपुरावा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांच्यात दिसते तर कार्यकर्त्यांनी केलेला पाठपुरावा आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे  नेतृत्व कसे असावे हे‌अजित पवार यांच्यातून दिसते.

Leave a Reply

You cannot copy content of this page