रक्षाबंधननिमित्ताने सीमेवरील जवानांसाठी सव्वा लाख राख्या, कोपरगावातील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा विक्रमी उपक्रम
On the occasion of Raksha Bandhan, one and a half lakh rakhis were distributed to the soldiers on the border, a record-breaking initiative by Sanjeevani Yuva Pratishthan in Kopargaon.
अनोखे रक्षाबंधन २२०० किमी.चा पल्ला पार केला
कोपरगाव: देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जात आहे,दिल्ली येथील सैनिक ट्रांझिट कॅम्पमधील जवानांना राख्या बांधण्यात आले यानंतर रात्री देशाच्या जम्मू काश्मीर सीमेवर देखील हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच, सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत संजीवनी प्रतिष्ठानचे युवासैनिक श्री साईबाबांचा आशीर्वाद घेऊन शिर्डी येथून ४ ऑगस्ट रोजी सव्वा लाख राख्या ऐतिहासिक अद्वितीय “राखी रथ” मधून श्रीनगर कडे कोपरगाव, येवला, मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदोर,ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली, अंबाला, अमृतसर, पठाणकोट, जम्मू, उधमपूर मार्गे श्रीनगर असे २२०० किलोमीटर अंतर पार करीत श्रीनगर येथे पोहोचला. मध्ये त्यांनी दिल्ली येथील सैनिक ट्रांझिट कॅम्पमधील जवानांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या. यावेळी, सैनिक भावुक झाले होते. दिल्ली ट्रांझिट कॅम्प येथून सर्व सैनिकांना लेह लद्दाक जम्मू काश्मीर या ठिकाणी रात्रंदिवस सीमा सुरक्षेसाठी तैनात केले जाते त्यामुळे या ठिकाणी सर्वच सीमेवरील सैनिक भेटले. यावेळी सैनिक भावूक झाले होते. यानंतर सायंकाळी श्रीनगर येथील जवानांना राखी बांधण्याचा कार्यक्रम झाला यावेळी मोठ्या संख्येने जवान हजर होते. हा क्षण सर्वांच्या हृदयात देशभक्ती आणि बंधुभाव याचा प्रत्यय येत होता

संजीवनी युवा प्रतिष्ठानने यावर्षी सव्वा लाखांचा विक्रम करण्याबरोबर २२०० किलोमीटरचा पल्ला पार करून पार केला या राखी रथाचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत झाले अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाक्याची आधीच बाजी करून स्वागत करण्यात आले.
चौकट
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या “एक राखी जवानों के नाम” उपक्रमाला मध्य प्रदेशचे माननीय कॅबिनेट मंत्री कैलास विजय वर्गीया यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि जोरदार स्वागत केले व आपले प्रेरणादायी विचार मांडले.





