राज्यातील लाडक्या बहिणींचे  लाडके देवाभाऊंच्या मनगटावर  स्नेहलताताईंनी बांधली राखी

राज्यातील लाडक्या बहिणींचे  लाडके देवाभाऊंच्या मनगटावर  स्नेहलताताईंनी बांधली राखी

Snehalatatai tied a rakhi on the wrist of the beloved Devabhau of the beloved sisters of the state

गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या हरिनाम सप्ताहाची सांगता

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 9Aug 17.50 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: भावा-बहिण्याच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या हरिनाम सप्ताहा कार्यक्रमासाठी आले असता रक्षाबंधनाचे औचित्य साधत राज्यातील लाडक्या बहिणींचे  लाडके देवाभाऊं अर्थात (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्या मनगटावर  (स्नेहलताताईं) अर्थात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांना राखी
बांधली .

महायुती सत्तेवर येण्यापुर्वी राज्यातील महिला भगिनींचे लाडके देवाभाउ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या तिजोरीतुन महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबविली ती कोटयावधी महिलांचा आधार बनली आहे. गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या हरिनाम सप्ताहाची सांगता वैजापुर तालुक्यातील शनिदेवगांव येथे गोदावरीधामचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने झाली त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हजेरी लावली त्या कार्यक्रमांत कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या हातावर रक्षाबंधनानिमीत्त राखी बांधत अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली. स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा विवेक कोल्हे भारतीय सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांसाठी राख्या घेवुन गेले असुन या उपक्रमाचे पाचवे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

          माजी आमदार स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला भगिनींचे लाडके भाउ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आगळीवेगळी प्रतिमा आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल कल्याणमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रूपये देवुन रक्षाबंधनाची अनोखी भेट दिलेली आहे. आज कोट्यावधी महिलांचा आर्शिवाद या महायुती शासनाच्या पाठीशी आहे. कोरोना महामारीमुळे एकल महिलाभगिनीस हा मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या संसार प्रपंपचाला लाडकी बहिण योजनेचा आधार मिळाला अनेकांच्या आर्थीक अडचणी दुर झाल्या.

हरिनाम सप्ताह आणि काल्याचे किर्तन ही अनोखी भक्तीची परंपरा गंगागिरी महाराजांनी १७८ वर्षापुर्वी घालुन दिली. महंत रामगिरी महाराजांनी त्याची व्याप्ती वाढवत लाखो भाविकांना त्यात सामावुन घेतले आहे. या उपक्रमांतुन अध्यात्मीक प्रबोधनाबरोबरच समाजातील अनिष्ठ चालीरिती अंधश्रध्दा दुर करण्यासाठीही जनजागृती केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या व्हीजनरी निर्णयाचा १३ कोटी महाराष्ट्रवासियांना फायदा होत आहे. याप्रसंगी अन्य मंत्री महोदयांनाही स्नेहलता कोल्हे यांनी राख्या बांधल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page