भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ‘वंदे भारत’ महाराष्ट्रात धावली; कोपरगाव चा पहिला प्रवासी  संवत्सरकर पती-पत्नी 

भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ‘वंदे भारत’ महाराष्ट्रात धावली; कोपरगाव चा पहिला प्रवासी  संवत्सरकर पती-पत्नी 

India’s longest-distance ‘Vande Bharat’ runs in Maharashtra; First passenger is Samvatsarkar couple from Kopargaon

सर्वात लांब पल्ल्याचा नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या १२ तासात 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 10Aug 20.50 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव नागपूर येथून निघालेली नागपूर पुणे  सगळ्यात लांब पल्याची वंदे भारत ही एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, येथे  रात्री आठ वाजता पोहोचली.कोपरगाव रेल्वे स्थानकावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे  माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात संजीवनी अकॅडमी व डि पॉल शाळेच्या मुलांनी तिरंगा दाखवत घोषणा देत वंदे भारतचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. कोपरगाव पुणे या प्रवासाचा मान संवत्सरकर  पती-पत्नीला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू रेल्वे स्थानकावरून अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रविवारी १० ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत हिरवा झेंडा दाखण्यात आला.

नागपूर येथून निघालेली सगळ्यात लांब पडल्याची नागपूर पुन्हा वंदे भारत ही एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, येथे  रात्री आठ वाजता पोहोचली .

कोपरगाव रेल्वे स्टेशन वरून पहिले प्रवासी कैलास संवत्सर कर व त्यांच्या पत्नी अनिता  संवत्सरकर या दोघांना कोपरगाव पुणे वंदे भारत  प्रवासी होण्याचा पहिला मान मिळाला . रेल्वे प्रशासनाकडून त्यांना कोपरगाव पुणे या प्रवासाचा मोफत पास देण्यात आला होता.ते गाडीत बसत नाही तोच   नाष्ट्याचे बंद पाकीट त्यांना देण्यात आले. रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने पाठोपाठ जेवणाचे जेवणाचे ताट समोर हजर झाले या सेवेमुळे संवत्सरकर पती-पत्नी भारावून गेले.

कोपरगाव स्टेशन येथे पुण्याकडे प्रस्थान करण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी हिरवा झेंडा दाखविला 

सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस :अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 881 किलोमीटरचे अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. महाराष्ट्रातील ही बारावी वंदे भारत आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन या मार्गावर ही गाडी धावेल. यामुळे व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवासाला मोठी चालना देईल. व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना याचा फायदा होईल.

Leave a Reply

You cannot copy content of this page