एकेकाळी कॅलिफोर्निया असलेले कोपरगाव आज गाव ते शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे येत आहे
Kopargaon, once a Californian village, is now emerging as an educational hub
आजचे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होणारे कोपरगाव उद्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र होऊ शकते…
ज्ञानाचा महामार्ग विकसित करण्यासाठी आता काळ साद घालत आहे.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 15Aug 17.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव,: हा बारमाही पाणी उसाची मुबलक शेती सहा साखर कारखाने फळबागा असा एकेकाळी समृद्ध शेतीमुळे कॅलिफोर्निया म्हणून संबोधला गेलेलं कोपरगाव आज गेल्या दीड दशकापासून विकासाच्या टप्प्यात निवासी क्षेत्रापासून समृद्ध शैक्षणिक लँडस्केपमध्ये उदयास येत आहे. गेल्या दिड दशकात या शैक्षणिक क्षेत्राला शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून खूप चांगला व मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे परिवर्तन स्थान आणि पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासारख्या घटकांमुळे झाले आहे, ज्यामुळे ते सर्वात पसंतीचे शैक्षणिक केंद्र बनले आहे.

कोपरगावच्या शिक्षण क्षेत्राला गौरवशाली वारसा लाभलेला आहे.
कोपरगाव शहरातील सर्वात जुनी पहिली मराठी शाळा नंबर एक ही इंग्रजांच्या काळात स्थापन झालेली आहे. साल निश्चित माहित नाही. मात्र १९२१ साली नगरपालिका प्राथमिक उर्दू शाळा नंबर ४ सुरू झाली. त्यानंतर श्रीमान गोकुळचंद विद्यालय ‘श्री. गो. विद्यालय आहे. ही शाळा कोपरगावमध्ये सन १९३४ मध्ये श्रीमान गोकुळचंद विद्यालय ही ५ ते१० मराठी शाळा सुरू झाली होती. पुढे एस जी हायस्कूल म्हणून ती नावारुपाला आली.
डॉ.सी. एम. मेहता कन्या विद्यामंदीरची स्थापना १९६३ मध्ये झाली, आणि ती खाजगी संस्थेद्वारे व्यवस्थापित केली जाते. ही शाळा शहरी भागात ५ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गांसाठी आहे. ही शाळा मुलींची आहे.

करमशीभाई सोमय्या व के. बी. रोहमारे यांच्या पुढाकारातून के. जे. सोमय्या कॉलेजची स्थापना १९६४ साली झाली.
कोपरगाव येथील जुने सायन्स कॉलेजची स्थापना जून १९६५ मध्ये झाली. त्यावेळी ते ‘विज्ञान महाविद्यालय’ म्हणून सुरू करण्यात आले. नंतर त्याचे स्थलांतर येवला नाका या ठिकाणी होऊन नामकरण श्री सदगुरू गंगागीर महाराज यांच्या नावावरून (एस एस जी एम कॉलेज) असे करण्यात आले.

पूर्वीच्या जुने सायन्स कॉलेज जागेवर कोपरगाव नगरपालिकेने १९८१-८२ मध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली आज तिथं आज ती शाळा स्वर्गीय माधवराव कचेश्वर आढाव विद्यालय या नावाने ओळखली जाते.,१९८३ मौलाना मुनीर उर्दू हायस्कूल ही शाळा मदरसा येथे सुरू झाली.

कोपरगावात ताकवले नावाच्या शिक्षकाने पहिली इंग्लिश मीडियम स्कूल काढली ताकवले स्कूल म्हणूनच ती ओळखली जात होती पुढे ती १९७४ साली सोमय्या ग्रुप विद्याविहार ट्रस्टच्या अधिपत्याखाली शारदा इंग्लिश स्कूल नावाने आज ओळखली जात आहे.

सेवानिकेतन कॉन्वेंट स्कूलची स्थापना १९८४ साली.
संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल १९८६ स्थापना झाली.
अशा पद्धतीने कोपरगावच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत वाटचाल सुरू झाली.
यांच्या शिक्षण संस्था
कोपरगाव शिक्षणाचे केंद्र म्हणून पुढे जाण्यात मुख्यत्वे येथील कर्मवीर शंकरराव काळे, रयत शिक्षण संस्थांचे जाळे, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल, सुशिलाबाई काळे विद्यालय, गौतम पॉलिटेक्निक कॉलेज, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवनी अकॅडमी, सैनिकी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, जूनियर कॉलेज, फार्मसी कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज पॉलीटेक्निक कॉलेज , अभियांत्रिकीच्या सर्व शाखा, संजीवनी युनिव्हर्सिटी, आयुर्वेदिक महाविद्यालय,
काळे कोल्हे मिळून सद्गुरु गंगागीर महाविद्यालय, स्वर्गीय के. बी. रोहमारे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे व के.जे. सोमय्या कॉलेज, जवळके, चासनळी, याठिकाणी ज्युनिअर कॉलेज, मूकबधिर विद्यालय स्वर्गीय गोकुळचंद ठोळे यांचे श्रीमान गोकुळचंद विद्यालय व बी. एम. ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल, स्वर्गीय डॉ. सी.एम. मेहता, कन्या विद्या मंदिर,स्वर्गीय माधवराव आढाव, कोपरगाव नगरपालिका शाळा व उर्दू शाळा, स्वर्गीय करमसीभाई सोमय्या, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, सोमय्या हायस्कूल साखरवाडी, स्वर्गीय ग.र. औताडे, विद्यालय पोहेगाव , कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था, गेल्या दशकात काका कोयटे, समता शैक्षणिक संकुल, विजय शेटे सर, श्री गणेश शैक्षणिक संकुल, राजेंद्र झावरे, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, नितीन औताडे यांचे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाविद्यालय, पटवर्धन यांचे शिशु विकास विद्यामंदिर,हिरालाल महानुभव, नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज, केशरबाई महानुभव नर्सिंग कॉलेज,विखे फाऊंडेशनचे महिला महाविद्यालय, ख्रिश्चन मिशनरी सेवानिकेतन, डी पॉल,जनार्दन स्वामी आश्रम महर्षी विद्यालय, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, इंग्लिश मीडियम स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, गुरुकुल, आदिवासी शाळा, स्पर्धा परीक्षांसाठी विशेष सोय,यासह इतर संस्था, चांगदेव कातकडे यांच्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अंतर्गत संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांचा समावेश आहे.

कोपरगाव हे ठिकाण सातत्याने सर्वोत्तम शैक्षणिक केंद्रांपैकी एक बनत चालले आहे
हे निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याचे कारण कोपरगाव हे महाराष्ट्रातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे इतर भागांशी (कनेक्टिव्हिटी) चांगले जोडलेले आहे. मात्र प्रत्यक्ष कोपरगावात चांगले व दर्जेदार रस्ते नसले तरीही या शहराला अहिल्यानगर, नासिक, पुणे, मुंबई, धुळे, संभाजीनगर, नागपूर या कोपरगाव मधून बाहेर पडणाऱ्या सर्व दिशांचे चारपदरी रस्ते, भारतभर धावणाऱ्या रेल्वे,शहरातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग व नागपूर मुंबई मग समृद्धी महामार्गामुळे आता मुंबई या सारख्या महानगरांना जोडणारे रस्ते, भारतभर धावणाऱ्या एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्या सह सर्व रेल्वेंना थांबा असलेले रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन, महत्त्वाचा माल धक्का, तालुक्यातील झपाट्याने विकसित होणारे शिर्डी विमानतळ, यामुळे कोपरगाव हे चहुबाजूने कनेक्टिव्हिटीने समृद्ध झाले आहे.
पौराणिक व ऐतिहासिक लाभलेला वारसा
जागतिक कीर्तीचे श्री साईबाबा देवस्थान, भारतातील एकमेव गुरू शुक्राचार्य मंदिर, चक्रधर स्वामी आश्रम, जनार्दन स्वामी आश्रम, आत्मा मालिक ध्यानपीठ केंद्र, कर्मवीर शंकरराव काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे हे दोन साखर कारखाने, संजीवनी आणि गोदावरी हे दूध संघ, औद्योगिक वसाहत, विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांची गतिशीलता सुनिश्चित करते. या कनेक्टिव्हिटीमुळे अनेक शैक्षणिक संस्थांच्या निर्मितीलाही योगदान मिळाले आहे. यामुळे प्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंत आता तर डॉक्टरेट पर्यंत असंख्य पात्रता प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थापन झालेल्या आहेत.
गेल्या दशकभरात, कोपरगाव शहरीकरणात अनेक पटीने वाढ झाली आहे.
यात प्रामुख्याने कैलासशेठ ठोळे व चंद्रभान पापडेजा यांचे भामानगर, भाग्यनगर व नाईक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रसाद नाईक यांचे रचना पार्क, यांचे मोठे योगदान असल्याने निवासी संकुले, व्यावसायिक युनिट्स आणि रोजगाराच्या वाढत्या विकासामुळे, गाव ते शहर म्हणून उदयास येत आहे. या प्रकारच्या शहरीकरणामुळे संस्थात्मक शिक्षणाच्या वाढीस मदत झाली आहे कारण येथे येणारी कुटुंबे व त्यांच्या मुलांसाठी शाळा याचबरोबर परिसरात आधुनिक सुविधांचा प्रचार आणि राहण्यासाठी चांगले वातावरण यामुळे, स्थानिक आणि बाहेरील विद्यार्थ्यांची या भागात ये-जा वाढली आहे, त्यामुळे अधिक शैक्षणिक सुविधांची मागणी वाढली आहे.
शैक्षणिक संसाधनासाठी अनुकूल वातावरण
या भागातील शैक्षणिक संस्थांच्या वाढीमध्ये परवडणाऱ्या जमिनीची उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर शहरांच्या मानाने जमिनीची किंमत तुलनेने कमी असल्याने, शैक्षणिक संस्थांना येथे मोठे कॅम्पस स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन मिळवता आली आहे. यामुळे ग्रंथालये, क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि वसतिगृहे यासारख्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती झाली आहे. परवडणाऱ्या जमिनीच्या उपलब्धतेमुळे शिक्षण क्षेत्रात खाजगी शाळांचा सहभाग वाढला आहे, परिणामी या इथे शैक्षणिक दर्जा वाढला आहे आणि निरोगी स्पर्धा वाढली आहे.
मानसिकता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर उभारलेल्या संस्था
कोपरगाव सारख्या ग्रामीण भागाला गाव ते आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे आणताना येथील स्वर्गीय के. बी. रोहमारे, स्वर्गीय ग.र. औताडे, स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे स्वर्गीय सहकार महर्षि शंकरराव कोल्हे स्वर्गीय करमसीभाई सोमय्या यांनी इथे शिक्षणाचा पाया रचला. कारण या नेत्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन काम करण्याची मानसिकता, सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि प्रोत्साहनदायक धोरणांमुळे झाली आहे. अनुदानित जमीन, सुलभ मंजुरी प्रक्रिया आणि रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची वानवा असतानाही केवळ मानसिकता व इच्छाशक्तीच्या जोरावर शैक्षणिक संस्थांनी या भागात कॅम्पस स्थापन केले आहेत. अशोक अशोकराव रोहमारे, अशोकराव काळे, नितीनदादा कोल्हे, नितीन औताडे या त्यांच्यापुढे पुढच्या पिढीने मात्र या संस्था सांभाळल्याच नाही तर त्या कालानुरूप त्यांची वाढ केली तंत्रज्ञान सुविधा यांची कास धरली सातत्याने नवे नवे बदल केले शहराच्या तोडीस तोड शिक्षण देऊन कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला अटकेपार झेंडा रोवण्याची प्रतिभा निर्माण करून दिली पिढी दर पिढी या शैक्षणिक संस्था मोठ्या होत गेल्या नावावर रूपाला आणल्या व आज त्यांनी राज्य सह देशात नावलौकिक प्राप्त केला आहे.
परदेशही शिक्षण घेण्याची सोय
या भागातील असंख्य शाळा विविध विषयांमध्ये पदव्या प्रदान करतात. येथील विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळण्यासाठी हे एक आकर्षक ठिकाण बनते. विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे याची खात्री देणे हे चांगल्या प्रकारे समर्पित शैक्षणिक संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक स्थानिक संजीवनी एज्युकेशन संस्था (अभियांत्रिकी कॉलेज,)कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी (के. जे. सोमय्या कॉलेज)यांची जगभरातील महाविद्यालयांशी भागीदारी आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचित होता येते आणि त्यांना हवे असल्यास परदेशातही शिक्षण घेता येते.
दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य
येथील शिक्षण संस्थांनी जपलेली विश्वासार्हता मुळे विद्यार्थ्यांना येथील शिक्षणाचे आकर्षण वाढवते या कारणामुळे कोपरगाव हे भविष्यात शैक्षणिक शहर म्हणून उदयोन्मुख आहे. मुलाला केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता दर्जेदार समग्र शिक्षण मिळावे हे सुनिश्चित करणे हे या परिसरातील शिक्षण संस्थांचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. ते विद्यार्थ्यांच्या विकासावर देखील लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये त्यांचे भावनिक आणि शारीरिक कल्याण समाविष्ट आहे. परिसरातील अनेक शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना खेळ, कलात्मक क्षमता आणि संस्कृतींसह सह-अभ्यासक्रम क्रियाकलाप करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी भरपूर उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल, शाळा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ञांना वेळोवेळी प्राचारण करतात.
येथील शिक्षण पुढील पिढीतील नेते, विचारवंत आणि नवोन्मेषकांना घडवत आहे.
मध्यवर्ती स्थान, विकास दर, जमिनीची कमी किंमत, अनुकूल सरकारी धोरणे, विविध शैक्षणिक संधी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर यामुळे कोपरगाव हे भविष्यातील एक आदर्श शैक्षणिक क्षेत्र आहे. तरुणांना जीवनासाठी तयार करणाऱ्या शिक्षक आणि पालकांच्या बाबतीत, संजीवनी अभियांत्रिकी सारख्या व युनिव्हर्सिटी या सारख्या संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून विद्यार्थी व पालकांना नोकरीची हमी व विश्वास देते आत्मा मालिक सारखी संस्था अध्यात्म, योग, मानसिक जडणघडण यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत असल्याने या संस्थांमध्ये संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालक यांना आकर्षित करतात, येथील शिक्षण पुढील पिढीतील नेते, विचारवंत आणि नवोन्मेषकांना घडवत आहे.
आंतरराष्ट्रीय खेळात कोपरगावचे नाव झळकत आहे
गेल्या काही वर्षांत कोपरगाव मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ८ ते १० इंग्रजी मिडीयम स्कूल उभ्या राहिल्या. या शाळांच्या माध्यमातून शहरातील मध्यम व उच्च मध्यमवर्गाची सोय झाली. गुणवत्ता व दर्जा यांची नामांकने मिळालेल्या या शाळा स्पर्धेच्या युगात आपापल्या परीने योग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेथून अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चमकून कोपरगावचे नाव देशविदेशांत झळकावत आहेत.
स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी
मातृभाषा व सेमी इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देणाऱ्या पालकांसाठी आनंददायी व प्रयोगशील शिक्षणाची कास धरणाऱ्या शाळासुद्धा कोपरगाव मध्ये निर्माण झाल्या. काही इंग्रजी माध्यमातील शाळाही अशाप्रकारे प्रयोगशील शिक्षणाची कास धरून आंतरराष्ट्रीय स्पर्धा व कार्यक्रमात नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत.
नॅक’ मानांकित महाविद्यालयं
सद्गुरु गंगागीर महा महाविद्यालय व के.जे. सोमय्या महाविद्यालय त्याचप्रमाणे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला यांनी सातत्याने राष्ट्रीय पातळीवरील ‘नॅक’ संस्थेकडून मूल्यांकन करून घेऊन अ दर्जा मिळवला आहे व तो दर्जा टिकविण्याच्या व वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.संजीवनी अभियांत्रिकेने सातत्याने मूल्यांकनात विविध रेकॉर्ड केले आहेत. के. बी. पी. पॉलिटेक्निकला तर सातत्याने सलग बारा वर्ष एन बी ए मानांकन मिळाले आहे ते महाराष्ट्रातील एकमेव पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ही बाब भूषणावह आहे.

चौफेर कनेक्टिव्हिटी; रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक सोयी
अहिल्यानगर, नासिक, पुणे, मुंबई, धुळे, संभाजीनगर, नागपूर या कोपरगाव मधून बाहेर पडणाऱ्या सर्व दिशांचे चारपदरी रस्ते, भारतभर धावणाऱ्या रेल्वे,शहरातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग व नागपूर मुंबई मग समृद्धी महामार्ग नैसर्गिक अनुकूलता, सोयीचे भौगोलिक स्थान, जमिनीची उपलब्धता, विजेची मुबलकता, मध्य प्रदेश आणि मराठवाडा सान्निध्य आणि स्थानिक उद्योगधंद्यांचा विकास यामुळे ५ इंटरनॅशनल स्कूल, १ अभियांत्रिकी महाविद्यालये, २ तंत्रनिकेतने, २ महाविद्यालये, एक महिला महाविद्यालय,एक वैद्यकीय महाविद्यालय, दोन आयुर्वेदा महाविद्यालय, दोन फार्मसी महाविद्यालये, एक विद्यापीठ, एक मूकबधिर विद्यालय दोन आदिवासी शाळा, आयटीआय कॉलेज, दोन नर्सिंग कॉलेज, एक लॉ कॉलेज, दोन उर्दू शाळा,असलेले कोपरगाव हे राज्यात उदयास आलेले नवीन एज्युकेशन हब आहे.
विकसित होणारे उद्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र
आजचे एज्युकेशन हब म्हणून विकसित होणारे कोपरगाव उद्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात साठ वर्षांतील पायाभरणीमुळे या शहरात ती क्षमता निर्माण झाली आहे. कोपरगाव मधून जाणारा काश्मीर ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग, होऊ घातलेला सुरत बेंगलोर हा आंतरराज्यीय महामार्ग यासाठी सर्वांना खुणावतो आहे. ज्ञानाचा महामार्ग विकसित करण्यासाठी आता काळ साद घालत आहे. एकेकाळी कॅलिफोर्निया असलेले कोपरगाव आज गाव ते शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे येत आहे.आजचे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होणारे कोपरगाव उद्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र होऊ शकते…
बाकी एवढं मात्र करा
मात्र यासाठी आजच्या नेत्यांना या दृष्टीने वाटचाल करताना केवळ शिक्षण एक सुविधा देऊन चालणार नाही तर त्याचबरोबर रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा सुद्धा सक्षम कराव्या लागतील येथील धार्मिक स्थळांना कॉरिडोर च्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याची गरज आहे. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने ‘स्मार्ट सिटी’ उभी करण्याची गरज आहे.
मा.श्री.राजेंद्र सालकर, पत्रकार
९९२१३९२३२
Post Views:
192









