येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार; भाजपचा झेंडा फडकविणार- स्नेहलता कोल्हे
Will contest all the upcoming local body elections with full force; Will hoist the BJP flag – Snehlata Kolhe
कोपरगाव विधानसभा भाजप पदाधिकारी सत्कार
माझा बूथ सर्वात मजबूत- विवेक कोल्हे
कोपरगांव :माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून भारतीय जनता पक्षाचा झेंडा अडकविणार असा आत्मविश्वास भाजपा कार्यकारी सदस्य स्नेहलता कोल्हे यांनी गुरुवारी भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे हे होते.
प्रारंभी शामाप्रसाद मुखर्जी, भारत माता, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले.
कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे पुर्व -पश्चिम मंडलातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, पॅरंट बॉडी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसुचित जाती मोर्चा, अनुसुचित जमाती मोर्चा, अल्पसंख्यांकासह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा नियुक्ती करण्यांत आली.
अध्यक्षीय सूचना साहेबराव रोहोम यांनी मांडली तर अनुमोदन केशवराव भवर यांनी दिले.
जिल्हा भाजपाचे विक्रम पाचोरे यांनी प्रास्तविकात भारतीय जनता पक्ष स्थापनेचा पुर्व इतिहास ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील संघटनात्मक कार्याचा लेखाजोखा मांडला.
कैलास राहणे यांनी कोपरगांव तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमांतुन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
माजी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता आणि पंतप्रधान मुख्यमंत्री यांना समान वागणूक असते असे विषद केले.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे (पुर्वभाग), सुनिल कदम (पश्चिम भाग), व शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यांसाठी जोमाने काम करू असे सांगितले.
भाजपाचे राज्य सदस्य ॲड. रविकाका बोरावके म्हणाले की, भाजपा पक्ष पातळीवर कोपरगांवात आता नवा जुना वाद राहिलेला नाही. संवाद झाला तर मने जुळतात. पदाच्या निवडीतुनकार्यकर्त्यांच्या गळयात सन्मानाची माळ पडली आहे तेंव्हा प्रत्येकांने जबाबदारी ओळखून झोकून देत काम केल्यास यश आपलेच असेल यावर विश्वास व्यक्त केला.
सौ.स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात देशात केलेल्या विकासात्मक कार्यामुळे भारत देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारली आहे. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने तळागाळातील घटकाच्या विकासात्मक कार्यासाठी नवनविन योजनांची आखणी करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले. लाडकी बहिण योजना राज्यात यशस्वी ठरली असुन असंख्य निराधार महिलांचा मुख्य आधार ठरला आहे, बचतगट चळवळीतुन महिलांमध्ये अर्थक्रांती होत आहे. तालुक्यात शहरात ज्या पदाधिका-यांना पद मिळाले त्यांनी त्या संधीचे सोने करून दाखवावे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मतदार संघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अविरत संघर्ष केला. हक्काच्या पाटपाण्यांसाठी स्वतःच्या सरकारविरूध्द रस्त्यावर येत शेकडो आंदोलने केली, आता प्रत्येकांने थांबायचे नाय तर लढायचे असेही त्या शेवटी आंदोलने केली असेही त्या म्हणाल्या.
युवानेते विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, आपल्या मतदारसंघात सर्वसामान्य घटक हा मुख्य केंद्रबिंदु आहे, त्याचे प्रलंबित प्रश्न सुटत नसेल तर सरकारमध्ये असलेल्यांना जाब विचारा. सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडविण्यांसाठी आहे. ग्रामिण अर्थकारणाला सहकारातुन चालना देत कोपरगांवची बाजारपेठ टिकवुन ठेवण्यांसाठी आजवर खूप मोठे काम केले.जनतेच्या प्रश्नासाठी सतत तळमळ सुरू आहे. येथुन पुढे येणा-या प्रत्येक निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. सत्ता असो किंवा नसो सेवा हाच धर्म मानून आपण कार्यरत असतो. देश आणि राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत मात्र स्थानिक पातळीवर थेट सत्तेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न सोडविण्याचे काम करण्या ऐवजी निकृष्ट कामे आणि गैरकृत्यांना अप्रत्यक्ष अभय देण्याचे काम सुरू आहे.प्रशासनावर वचक नाही अशी खरमरीत टीका केली. सातत्याने जनतेच्या सुखःदुःखात धावणांरा कार्यकर्ताच असतो जो मोठा नेता मोठा होतो कारण सेवा करणाराला फार प्रचार करण्याची गरज पडत नाही जनता त्याला डोक्यावर घेते असे सांगुन त्यांनी संजीवनी मत्स्य विकास संस्थेअंतर्गत एक हजार शेतक-यांसाठी प्रायोगीक तत्वावर मत्स्य पालन व्यवसाय सुरू केला असुन नविदिल्लीत देशपातळीवर आपल्याच संस्थेला याबाबतची माहिती देण्यासाठी सादरीकरणाची संधी मिळाली आहे असे ते म्हणांले.
शेवटी तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे, सुनिल कदम यांनी आभार मानले.यावेळी आजी माजी पदाधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक,कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





