निवारातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात भात लेपन सोहळा संपन्न 

निवारातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात भात लेपन सोहळा संपन्न 

Rice coating ceremony held at Kashi Vishweshwar Mahadev Temple in Niwar

श्रावण समाप्ती  महाआरती व संत पूजनाने

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 23Aug 18.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : निवारा सोसायटीतील “काशी विश्वेश्वर महादेव” मंदिरात शुक्रवारी (२३) रोजी सायंकाळी श्रावण मास समाप्ती निमित्ताने ‘भात लेपन सोहळा’ मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. यानिमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेल्या भगवान शंकराच्या मूर्ती व महादेव पिंडीचा महाआरती व उपस्थित संतांचे पूजन करण्यात आले.

हा धार्मिक सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राजेश्वरानंदगिरी महाराज, साध्वी शारदानंदगिरी, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे, निवारा हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक  काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळ्याचे आयोजन निवारा भजनी मंडळ अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर साई निवारा मित्र मंडळ अध्यक्ष जनार्दन कदम यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

निवाऱ्यात काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी व पिंडीची प्राणप्रतिष्ठा  ४० वर्षांपूर्वी काशीबाई दादाप्पा कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. तेव्हापासून या मंदिरात कार्तिक महिन्यात काकड आरती अविरतपणे बाबासाहेब कापे व हौशीराम बर्गे यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याचप्रमाणे गेल्या पंधरा वर्षापासून श्रावण मासानिमित्त या मंदिरात भात लेपन मोठ्या श्रद्धेने केले जात आहे.
या भक्तिमय सोहळ्यासाठी निवारा, ओम नगर, शंकर नगर, कोजागिरी कॉलनी, सुभद्रा नगर, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, रिद्धी-सिद्धी नगर, शिंगी-शिंदे नगर, साई सिटी, जानकी विश्व, येवला रोड आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रमुख संत-महंतांचे पूजन संदीप ओमप्रकाश कोयटे, सौ.स्वाती संदीप कोयटे व जनार्दन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

काशीबाई दादाप्पा कोयटे यांच्या समवेत प्राणप्रतिष्ठा प्रसंगी उपस्थित राहून आजवर शंकर भक्तीत रमलेल्या जेष्ठ महिला शिवभक्त श्रीमती विमल दत्तात्रय कर्डक, सौ.सुशीला श्रीरंग झावरे, श्रीमती कमल बाजीराव पाटील, श्रीमती कमल चंद्रकांत गिरमे, श्रीमती विमल रामनाथ भट्टड, श्रीमती सुलोचना विष्णू गागरे, श्रीमती द्वारकाबाई श्यामलाल भट्टड व श्रीमती यमुनाबाई रोकडे यांचा साध्वी शारदानंदगिरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी बाबासाहेब जंगम, माजी नगरसेविका दीपाताई गिरमे, बापूसाहेब इनामके, प्रदीप साखरे, रामोशेठ पटेल, राजेंद्र नानकर, चांगदेव शिरोडे, सुरेंद्र व्यास, विष्णुपंत गायकवाड, लक्ष्मीनारायण भट्टड, डॉ.नरेंद्र भट्टड, अमोल राजूरकर, वैभव गिरमे, जगन्नाथ बैरागी, श्रीरंग झावरे, सुरेश भडकवाडे, नानासाहेब गव्हाणे, धनंजय भडकवाडे, डॉ.अच्युत कर्डक, बाळकृष्ण उदावंत, कमलाकर नरोडे, दशरथ सरवान, संतोष बैरागी, कृष्णा गवारे, ओम उदावंत आदींसह परिसरातील शिवभक्त परिवारासह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अनंत बर्गे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page