कोपरगावची ‘मिसळ “सावजी’ ;माजी आमदार ताईंनी घेतला मिसळ पावचा आस्वाद
Kopargaon’s ‘Misal “Savji”; Former MLA Tai tasted Misal Pav
स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट चे झेंडावंदन झाले आणि…. अन सकाळच्या नाश्त्यासाठी माजी आमदार कोल्हेताईंनी आपला मोर्चा इंदिरा शॉपिंगच्या बाजूला असलेल्या सावजी मिसळ कडे वळविला
कोपरगाव : शुक्रवारी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपर्क कार्यालयातील झेंडावंदन आटोपून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विघ्नेश्वर गणरायाचे दर्शन घेऊन जात असताना येथील ‘सावजी मिसळ’ चे मालक अरविंद पैलवान यांनी त्यांना सकाळच्या नाश्त्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर माजी आमदार ताईंनी आपला मोर्चा इंदिरा शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या,”सावजी मिसळ’कडे वळवला. कोणत्याही विषयावर फारशी चर्चा न करता काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह खवय्या माजी आमदार कोल्हेताईंनी यांनी मिसळ पावचा मनसोक्त अस्वाद घेतला.
एरव्ही, कोपरगाव शहरातील सर्वच पक्षाचे मोठमोठाले पदाधिकारी यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी आणि सिने कलाकारांनी सावजी च्या मिसळचा आस्वाद घेतला आहे. यापूर्वी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, आमदार आशुतोष काळे, संजीवनी प्रतिष्ठानचे सुमित कोल्हे, कल्याणचे महापौर अशा अनेकांनी या मिसळीची चव चाखली आहे. अनेक जण ‘सावजी मिसळी’चा आस्वाद घेण्यासाठी अधूनमधून येतात. परंतू, ते थेट हाॅटेलमध्ये येण्याऐवजी अनेक जण आपल्या कॅबिनमध्ये मिसळ मागवून घेतात. असे या दुकानाचे मालक अरविंद पहिलवान यांनी ‘दैनिक पुण्यनगरी’ सांगितले.
सकाळी साडेनऊ दहा वाजेच्या सुमारास माजी आमदार स्नेहलता कोल्हे या संपर्क कार्यालयातील ध्वजारोहण आटोपून विघ्नेश्वर चौकातील विघ्नेश्वर गणरायाचे दर्शन घेऊन बाहेर पडत असताना रस्त्याच्या समोर रस्त्यात गजरे विकणाऱ्या सुरेखा पंडोरेताईंनी त्यांना हाक मारली त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात केवळ व्यवसाय नव्हता तर एक आपुलकीचा स्नेहभाव होता त्यांच्या त्या निखळ प्रेमाचा स्वीकार करत स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या त्यावेळी पंडोरेताईंनी स्वतःच्या हाताने सुंदरसा गजरा त्यांच्या केसात माळला.

यावेळी पंडोरेताईंच्या निरागस चेहऱ्यावर उमटलेले आत्मिक समाधान सौ. कोल्हेताईंच्या मनात कायमचं कोरलं गेलं त्या गजरा मारणाऱ्या पंडोरेताई भावूक झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव पाहून कोल्हेताईंना देखील एक वेगळच समाधान लाभलं हा एक आगळावेगळा क्षण यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनुभवला.
या संधीचा फायदा घेत जवळच असलेल्या ‘सावजी मिसळ’ चे मालक अरविंद पैलवान यांनी कोल्हेताईंना मिसळ खाण्याचा आग्रह केला त्यांचा मान राखत कोल्हेताई यांचा ताफा सावजी मिसळमध्ये दाखल झाला. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर आणि आतही ग्राहकांसह ध्वजारोहणासाठी आलेल्या कोपरगावकरांची त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. आमदार ताईंसाठी टेबलवर मिडियम मिसळ पाव मागविण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत काही गिऱ्हाईकांनी मिसळीची चव चाखली. सावजी मिसळचे मालक अरविंद पैलवान यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे वेगळेच भाव पहायला मिळाले.
यावेळी अनेकांनी सेल्फीही काढला. मिसळवर ताव मारल्यावर आमदार ताईंनी रितसर अडीच हजार रुपयांचे बिल अदा करुन पुढच्या दाैऱ्याला मार्गस्थ झाल्या. त्यांनी बिल अदा केल्यानंतर त्यांचा ताफा तिथून गेला. मात्र , त्यांच्या मिसळ खाण्यामुळे कोपरगाव ची ‘सावजी मिसळी’ची चर्चा खऱ्या अर्थाने चांगलीच चर्चा रंगली होती.
चौकट
सन १९४० पासून मालक स्वर्गीय बाबुराव तुकाराम पहिलवान यांनी मेन रोड येथे ‘आशा रेस्टॉरंट’ नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. मात्र सन २०११ मध्ये अतिक्रमणात व्यवसायाला मोठा फटका बसला, त्यांचे चिरंजीव अरविंद पैलवान यांनी हार न मानता पुन्हा उभारी घेतली.आपल्या पत्नी व तीन उच्चशिक्षित मुलांसह ते सावजी कुटुंबीय मिसळपाव, शाकाहारी जेवण आणि मराठा घरगुती काळ्या मसाल्याचे पदार्थ सुरू करून त्यांच्या विविध पदार्थांची चव कोपरगाव करांच्या जिभेवर कायम रेंगाळते.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मिसळ खाण्याचा योग हा खरंच भाग्याचा क्षण. रेस्टॉरंटचे अरविंद सावजी व त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रेमाने पाहुणचार केला, ते शब्दांत मांडता येणार नाही.स्वातंत्र्य दिनाचा दिवस केवळ राष्ट्रीय अभिमानाचा नव्हता, तर मनाला भिडणाऱ्या या दोन सुंदर अनुभवांनीही समृद्ध झाला अशी प्रतिक्रिया सौ. कोल्हे यांनी दिली.





