महालक्ष्मीनिमित्त कोपरगाव बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; फायबर मुखवटयांना ज्यादा मागणी
Crowds throng Kopargaon market for shopping on the occasion of Mahalaxmi; High demand for fiber masks
यावर्षी आरास मुखवटे-दागिन्यांनी बाजारपेठ फुलली. नवी डिझाईन, आकर्षक सवलती
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 26Aug 18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : गणपती आगमनानंतर वेध लागतात गौरीच्या आगमनाचे. शनिवारी (ता. २९) सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या या सणानिमित्त घरोघरी तयारी करण्यात आली असून विविध साहित्यांनी बाजारपेठ देखील फुलली आहे.
महालक्ष्मी सणाच्या आगमनाने बाजारपेठांमध्ये गौरींचे मुखवटे, विविध प्रकारचे दागिने, साड्या आणि सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने महिलांची खरेदीसाठी गर्दी बघायला मिळते आहे. विशेषतः गणेशोत्सवानंतर लगेच येणाऱ्या महालक्ष्मी सणासाठी घराघरात तयारी सुरू आहे आणि याच तयारीचा भाग म्हणून बाजारपेठांमध्ये मुखवटे व दागिन्यांचा मोठा साठा उपलब्ध असतो. यावर्षी फायबर वस्तूंना ज्यादा मागणी वाढली आहे.

गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे,सुवर्ण-रौप्य अलंकार, रंगीबेरंगी मण्यांचे हार, पायातील तोडे, बांगड्या, मुकुट, कर्णफुले, नथ, काचकामाचे दागिने गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, बोरमाळ, मंगळसूत्र, कंबरपट्टे, चपलाहार यांसारखे असंख्य दागिने बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय देवीच्या आकर्षक पितळी, फायबर, मुखवट्यांना, फुलांच्या आरासेला आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्यालाही चांगली मागणी आहे.सणानिमित्त घराघरात लगबग सुरू असते आणि महिला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करतात.

गणेशोत्सवात जसे घराघरात उत्साहाने आरास केली जाते, तसेच महालक्ष्मी पूजनातही स्त्रिया मोठ्या आवडीने महालक्ष्मी देवीला सजवतात. त्यामुळे बाजारात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
भाविकांना देवीची सजावट अधिक आकर्षक आणि भव्य दिसावी यासाठी पारंपरिक दागिन्यांसोबतच हलक्या वजनाच्या कृत्रिम दागिन्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. काही भाविकांनी घरगुती देवी सजावटीत पर्यावरणपूरक संकल्पना आणून कागद, फुले व नैसर्गिक वस्तूंनी केलेली सजावट निवडली आहे.
गणपती आगमना बरोबर शहरातील गल्लीबोळात आता “महालक्ष्मी अलंकार” विक्रीचे दुकानं व स्टॉल्स गजबजले आहेत. या खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साही वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
कोट
दुकानदारांनीही आकर्षक सवलती व नवीन डिझाईन्स उपलब्ध करून दिल्याने खरेदीचा उत्साह आणखीनच वाढला आहे. मुखवटे सातशे रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत, त्यात पीओपी फायबर पितळी तीन हजार ते दहा हजार, महालक्ष्मी पुढे वारकरी नाचतानाचा, ज्ञानेश्वर माऊली रथ, झांज पथक, वासुदेव आदि प्रकारचे सेट सातशे रुपये पासून पंधराशे रुपये पर्यंत, मंडप दोन हजार ते पाच हजार पर्यंत, पायऱ्या तीन ते चार हजार, विविध प्रकारच्या लहान मोठ्या समया, दिवे, निरंजनी यांनाही चांगली मागणी आहे. तसेच महालक्ष्मी साठी लागणारी ज्वेलरी यालाही चांगली मागणी आहे असे बिरोबा चौकातील महालक्ष्मी, धनंजय मेटल स्टील सेंटर चे मालक धनंजय कानडे व सौ ज्योती कानडे यांनी सांगितले.
Post Views:
69





