एकरी १०१ मेट्रिक टन ऊस काढा एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मिळवा- आमदार आशुतोष काळे
Harvest 101 metric tons of sugarcane per acre and get a reward of seventy-one thousand rupees – MLA Ashutosh Kale
ऊस उत्पादन वाढीसाठी बक्षीस योजनेचा फंडा
उसाला अंतिम भाव ३१०० तर ठिबक साठी आणखी शंभर रुपयाचे अनुदान
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 30Aug 18.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: वारंवार सभासदाकडून आपल्या पाहुण्यांचा देखील ऊस घ्या अशी मागणी असायची याचा विचार करून कारखान्याचे आधुनिकरण करून क्षमता वाढविले आहे. मुळात ऊस हा आर्थिक उत्पन्न देणारा असताना अनेक जण कांदा आणि गहू पिकाकडे वळाले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी आहे. जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी कारखान्याने बक्षीस योजना आणली असून एकरी १०१ मेट्रिक टन उत्पन्न उसाचे उत्पन्न काढा आणि ७१ हजार बक्षीस मिळवा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी सभेच्या अध्यक्षपदावरून बोलतांना उपस्थित शेतकरी व सभासदांना केले.तर उसाला अंतिम भाव ३१०० तर ठिबक साठी आणखी शंभर रुपयाचे अनुदान देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी(३०) रोजी ३ वाजता कारखाना कार्यस्थळावर पार पडली.
सकारात्मक वातावरणात पार पड़लेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे हे होते., माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ,व्हा चेअरमन प्रवीण शिंदे, प्र. कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे , आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख सर्व संचालक मंडळ, कामगार बंधु यांच्यासह उस उत्पादक, सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर शंकरराव काळे स्वर्गीय सुशीलामाईसाहेब काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी अहवाल सालातील निधन झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले एकरी १०० मॅट्रिक टन उत्पन्न घेणाऱ्याला ५१००० बक्षीस ८० ते ९० टन उत्पन्न घेणाऱ्याला ३१ हजार बक्षीस तर ७५ ते ८० मॅट्रिक टन उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला २५ हजाराचे रोख बक्षीस देण्यात येईल. ठिबक द्वारे लागवड केल्यास त्यांना शंभर रुपये अनुदान देण्यात येईल.त्याबरोबर कारखान्याने यावेळेस मोबाईलद्वारे नोंदणी करण्याचा व सुसंवाद साधण्याच्या व्यवस्था केलेली आहे उसाचे उत्पन्न वाढावे यासाठी तज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने अँड्रॉइड मोबाईल घ्या, जीपीएस सिस्टीम द्वारे सर्वकाही आता मोबाईलवरच बघायला मिळेल.
आर्थिक अहवाल, मागील सभेचे इतिवृत्त आणि यांनी सभेचे विषय प्रभारी कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे यांनी सादर केले.वार्षिक अहवालांना सभासदांनी एक मुखाने मंजुरी दिली.
कारखान्याचे सर्व कामगार, संचालक, अधिकारी व सर्व सभासदांच्या सहकार्याने अनेक आव्हानांचा सामना करत काळे सहकारी साखर कारखाना सुरु झाला, आपण कायम समान दर दिलेला आहे. इतर कारखान्यांचा बरोबरीने अंतिम दर ३१०० अधिक ठिबकचे शंभर रुपये अनुदान देण्यात येईल व रिकव्हरीमध्ये देखील आपला कारखाना अव्वल राहिला निर्यातीमध्ये चांगला भाव मिळालेले आपला त्याचा फायदा झाला, केंद्रीय सहकार खात्याने आपल्याला चांगली मदतीचा हात दिला. केंद्राने एनसीडीसी या संस्थेला निधी दिला या संस्थेने अल्प दरात कर्ज देण्यासाठी राज्यातील 26 कारखान्यांची निवड केली त्यात आपल्या कारखान्याची निवड झाली त्यामुळे आपल्याला एनसीडीसी कडून अल्प दरात कर्ज मिळाल्याने मोठा फायदा झाला, आधुनिकीकरणामुळे बग्याज मध्ये जाणारी साखर आपल्याला मिळणार आहे त्याची आर्द्रता ५० टक्के पर्यंत कमी करता येणार आहे, आपण कारखान्यात केलेल्या बदलामुळे क्षमता दहा हजार मिलिटरी टनापर्यंत जाऊ शकते परंतु आपल्याला यासाठी सर्वच बाबींचा विचार करावा लागेल, डिस्टिलरी मध्ये देखील पेंट वॉश जाळून आपण चांगल्या पध्दतीने बदल करून शून्य डिस्चार्ज पर्यंत आणलेला आहे, मद्यविक्री च्या चांगल्या खपामुळे आपल्याला एफ. आर. पी. देण्यास मदत झाली आहे आपण आर्थिक शिस्त मोडली नाही, चांगला भाव देखील दिला याचा मला अध्यक्ष या नात्याने अभिमान आहे. कारखाना नव्या दमाने, पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी समाधानी असून कारखान्याच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला .यात आडसाली-व्यंकटेश प्रतापराव बारहाते, संवत्सर, पूर्व हंगामी-सौ.केशरबाई भाऊसाहेब जाधव,शहा, सुरु-बाळासाहेब ठकाजी खळदकर, वारेगाव, खोडवा-राजेंद्र साहेबराव माळवदे, धोत्रे या ऊस उत्पादक शेतक-यांचा समावेश होता.
व्हाइस चेअरमन प्रवीण शिंदे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अरूण चंद्रे यांनी केले.
चौकट
गाळप हंगाम २०२४-२५ च्या गळीतास आलेल्या ऊसाला पहिले पेमेंट रु.२८००/- प्र.मे.टन याप्रमाणे अदा केले असून शेतक-यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात रु. १५०/- प्र.मे.टन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे. तर आता दसऱ्याला दीडशे रुपये चा तिसरा अंतिम हप्ता देणार ठिबक सिंचन करणाऱ्यांना प्रत्येक टनाला शंभर रुपये अनुदान देणार – आमदार आशुतोष काळे
Post Views:
41





