समता पतसंस्थेची सहकारी बँकेकडे वाटचाल; रिझर्व बँकेची शिफारस प्राप्त-  संदीप कोयटे

समता पतसंस्थेची सहकारी बँकेकडे वाटचाल; रिझर्व बँकेची शिफारस प्राप्त-  संदीप कोयटे

Samata Patsanstha moving towards cooperative bank; Reserve Bank recommendation received- Sandeep Koyte

४२ नागरी सहकारी व मल्टिस्टेट बँकांच्या विविध आर्थिक गुणोत्तरात  समता पतसंस्थेची निवड

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 26Aug 18.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  : नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अँड क्रेडिट सोसायटी या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेमार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेवरून डी.कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्क फोर्स समितीकडून कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेला नागरी सहकारी बँक लायसन मिळण्यासाठी नुकतेच शिफारस पत्र प्राप्त झाले आहे. समता पतसंस्थेचे नागरी सहकारी बँकेत रूपांतर करण्याबाबत गांभीर्याने व काळजीपूर्वक विचार सुरू असल्याची माहिती युवा संचालक संदीप ओमप्रकाश ( कोयटे यांनी दिली.

अधिक माहिती देताना संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड म्हणाले की, भारतातील मोठ्या शहरांमध्ये किमान एक तरी नागरी सहकारी बँक शाखा असावी या उद्देशाने संबंधित समितीने देशातील बँकिंग निकष पात्र झालेल्या ४२ नागरी सहकारी व मल्टिस्टेट बँकांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये भागभांडवल, ठेवी तसेच विविध आर्थिक गुणोत्तरांचा विचार करून समता पतसंस्थेची निवड करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारी बँकांना अधिक वाव मिळावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. समता पतसंस्थेने गेल्या ३९ वर्षांपासून ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग टिकवला असून ठेवी व कर्जात सातत्याने वाढ होत आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून समताने केवळ सहकारी पतसंस्था क्षेत्रातच नव्हे तर देशातील बँकिंग क्षेत्राचेही लक्ष वेधून घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील पतसंस्था फेडरेशननेही समताच्या तंत्रज्ञानाधारित कामकाजाचा अनेक वेळा गौरव केला आहे. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे ९९.८१% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय असल्याचे संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी सांगितले.

देशातील नागरी सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उपलब्ध नसतील एवढे तंत्रज्ञान व ग्राहक सेवेमुळे समता पतसंस्थेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लक्ष वेधून घेतले असल्याचे या शिफारस पत्रावरून सिद्ध झाले आहे.

बँकिंग क्षेत्रात गेल्यानंतर ग्राहक सेवा सामाजिक काम जलद सुधारणा वेगाने करता येतील का ? तसेच पतसंस्था चळवळीत असलेले काम करण्याची स्वातंत्र्य टिकवता येईल का ? याबाबत सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे काम चालू असल्याचे समताचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा यांनी सांगितले.

देशातील नागरी सहकारी बँकांवर जरी नव्याने बंधने येत असतील तरी हे सर्व बंधने आणण्यापूर्वीच ही बंधने स्वीकारण्याची परंपरा समताने आजतागायत ठेवलेली आहे. कर्ज वाटपाच्या दृष्टीने देखील कमीत कमी व्याजदरात ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. तसेच समताच्या थकबाकी वसुलीचा पॅटर्न संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी बँका व पतसंस्था समताला भेट देण्यासाठी येत असतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी सर व्यवस्थापक भार्गेश्वर बॅनर्जी यांनी देखील समता पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून प्राप्त झालेल्या शिफारस पत्रामुळे समताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीला मिळालेला बहुमान आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page