विवेक कोल्हे यांनी घेतला आमदार आशुतोष काळे यांचा खरपूस समाचार

विवेक कोल्हे यांनी घेतला आमदार आशुतोष काळे यांचा खरपूस समाचार

Vivek Kolhe received the harsh news from MLA Ashutosh Kale

गुन्हेगारांना पाठीशी घालून आ.का. बनू नका त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 27 Sap18.40 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: विधानसभेला उपकार केले का ? म्हणणाऱ्या आमदार आशुतोष काळेंनी शिक्षक मतदार संघात विरोधात काम केले असतानाही महायुती आणि पक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे काम केल्यानेच मताधिक्य मिळाल्याने राज्यातील पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांची गणना कुणामुळे झाली याचा त्यांना विसर पडलाय म्हणून का सहा महिन्यातच त्यांनी रंग बदलायला सुरुवात केली अशा शब्दात युवा नेते विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांचा खरपूस समाचार घेतला.

२९ ऑगस्ट रोजी झालेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेत सन २०२४ च्या विधानसभेत मताधिक्य मिळून सत्ता मिळाली’, अशी उपकार केल्याची भाषा काहीजण करायला लागल्याची टीका आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली. त्यांनी मार्केट कमिटी आणि शिक्षण संस्था, निवडणुकांचे अवलोकन केले तर त्यांचा हा गोड गैरसमज दूर होईल, अशा शब्दांत आ. काळे यांनी कोल्हे यांना पुन्हा एकदा डिवचले होते.नेमके याच मुद्द्यावरून  शनिवारी २७ सप्टेंबर रोजी  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या जाहीर सभेत यावरून विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांना लक्ष केले.

त्यात नवरात्रात आ. काळे यांचे स्वीय सहाय्यक यांनी दगडफेक आणि पोलिसांवर हात उचलण्याच्या कारणावरून आ. आशुतोष काळे यांना घेरण्याचा प्रयत्न  करतानाच विवेक कोल्हे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालून संस्कृती बिघडणारा आ.का. बनू नका अशा शब्दात खरपूस समाचार घेताना आरोपी स्विय्य सहाय्यकाला आ. काळे यांनी पोलिसांकडे हजर करावे, असं आवाहन यांनी केलं

आमदार काळे यांच्या स्वीय सहाय्यकाने दगडफेक केल्यामुळे आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही गोळीबार प्रकरणात आणि अवैध धंद्यात त्यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले.नवरात्र सारख्या उत्सवात हे घडते, रक्षकच भक्षक झाले यापेक्षा दुर्दैव काय?  असा सवाल करताना गुन्हेगारांना पाठीशी घालणे, दोन नंबर वाल्यांना राजाश्रय देण्यासाठी आमदार रात्री आणि पीएला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. तालुक्याची परंपरा संस्कृती धुळीस नेण्याचे काम चालू आहे राज्यात प्रतिमा मलिन होत आहे याचा विचार करा विनंती करतो कोपरगावचे बीड होऊ देऊ नका असे खडेबोल सुनावले.

१६ वर्षे तुम्ही सत्तेत आहात त्यांना आपण काय न्याय दिला याचा लोकांना अनुभव येत आहेत. निकृष्ट रस्ते,अवैध धंदे,गुन्हेगारी, भ्रष्टाचार, टक्केवारी कारभार करून लोकांना फसवले, दिशाभूल केली, रोजगार घालवला यामुळे नागरिक जेरीस आले आहेत. जनतेच्या उपकाराची परतफेड तुम्ही या प्रकाराचा कारभार करून करत असाल तर परिणाम जनता दाखवून देईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. असे विवेक कोल्हे  म्हणाले,

मतदार संघासाठी ३००० कोटीचा निधी आणल्याच्या वल्गणा करता प्रत्यक्षात मतदार संघात विकासाची परिस्थिती काय आहे,? एवढा निधी आला असता तर प्रत्येक ग्रामपंचायतीला १० ते १४ कोटी रुपये मिळाले असते असा हिशोब देखील त्यांनी मांडला.

चौकट

आमदार आशुतोष काळेंनी २९ ऑगस्ट च्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ७२ व्या सर्वसाधारण सभेत डिवचले होते  याचे उट्टे शनिवारी (२७) रोजी विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  काढल्याची जोरदार चर्चा सुरू होती .

Leave a Reply

You cannot copy content of this page