कोपरगाव तालुक्यात पावसाचा कहर ;आ.आशुतोष काळेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला
Rain wreaks havoc in Kopargaon taluka; A. Ashutosh Kale interacted with farmers and gave them encouragement
भर पावसात बांधावर जाऊन केली पाहणी ६५ मिलिमीटर पावसाची नोंद सरसकट पंचनामे करा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun28 Sap18.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यात गेल्या १८ तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्याला रात्रभर चांगलेच झोडपले या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात मतदारसंघात नुकसान झाले आहे. रविवार (दि.२८) रोजी सकाळपासून भर पावसात आ. आशुतोष काळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतांना मी व महायुती सरकार आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देऊन शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

शनिवारी (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले. काढणीला आलेल्यासोयाबीन,बाजरी,कापूस, मका,तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले.सर्वच ओढे नाले भरून वाहत होते त्यामुळे सर्वच ओढ्या नाल्यांना पूर येवून रस्ते बंद होवून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
तालुक्यातील सर्वच मंडळात साधारणता ६५ किलोमीटर पावसाची नोंद झाल्याने सर्वेकडेच बिकट परिस्थिती निर्माण झाली असून सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना देखील आ. काळे यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला सूचना देवून नागरिकांच्या राहण्याची,भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून मदत केली.
गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.एकाचवेळी पावसाचा कहर आणि गोदावरी नदीला आलेला महापूर अशा दुहेरी संकटात सर्व परिस्थितीवर आ.आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते. कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील सुरक्षित स्थळी हलविलेल्या नागरीकांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था करून मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी काही मदत लागल्यास प्रशासन यंत्रणा व माझ्या यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
प्रसंगी पंचनामे करण्यासाठी त्याठिकाणी ड्रोन, मोबाईल फोटो यांची मदत घ्या. नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेवून पंचनामे करावे.केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.
चौकट :-कोळ नदी व चोंढी नाल्याच्या पुरामुळे वारी येथील माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके कुटुंबातील सहा सदस्य अडकून पडले होते. कमरेपर्यंतच्या पाण्यात उतरून आमदार आशुतोष काळे यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये बसून देखील त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही यानंतर त्यांनी तातडीने तहसीलदार यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला बोलविण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे कलेक्टर यांच्याकडे हेलिकॉप्टरची मागणी केली .
Post Views:
88







