उपकार केल्याच्या भ्रमात नका विश्लेषण देण्यास माझी तयारी- आ.आशुतोष काळे
Don’t be under the illusion of being a favor, I am ready to give an analysis – A.Ashutosh Kale
आमदार आशुतोष काळेंचे विवेक कोल्हेंना थेट आव्हान
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 27 Sap18.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: उपकार केल्याच्या भ्रमात नका विश्लेषण देण्यास माझी तयारी असल्याचे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांचे विधानसभेला उपकार केल्याचे विधान खोडून काढीत थेट विश्लेषणाची तयारी असल्याचे आव्हान दिले आहे.
शनिवारी (२७) रोजी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेस प्रेसिंग सर्वसाधारण सभेतून वारंवार विधानसभेला आमदार आशुतोष काळे यांना आपल्यामुळेच मतदान मिळाले या कोल्हे यांच्या वक्तव्यावर संतप्त झालेल्या आ.आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांना थेट आव्हान दिले.
याबाबत बोलताना आ.आशुतोष काळे म्हणाले, २०२४ च्या माझ्या विधानसभा निवडणूकी अगोदर चार-पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली. त्या निवडणुकीत माझ्यासह सर्व महायुतीचे नेते सर्व ताकदनिशी निवडणुकीला सामोरे गेले. परंतु असे असतांनाही लोकसभा निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातून अवघे सहा हजाराचे लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाले. ज्यावेळी मी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळी प्रचार करणारे महायुतीचे नेते तेच होते व मतदारही तेच होते पण मी सव्वा लाखाच्या लीडणे निवडून आलो. त्याचे श्रेय तुम्ही घेवू नका. ए पब्लिक है, ए सब जाणती है. असा मिश्किल टोला लगावला.
अजूनही तुम्ही भ्रमात असाल तर त्याचे विश्लेषण करण्यास मी तयार आहे. तुम्ही जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावोगावी कार्यकर्त्यांच्या घोंगडी बैठका घेवून खाजगीत माझ्यावर राजकीय उपकाराची भाषा करतात त्यामुळे मला हि विश्लेषण करायची वेळ आली.आगामी काळात याबाबत तुम्हाला अजून विश्लेषण पाहिजे असल्यास त्याबाबत माझी तयारी आहे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी शेवटी पुन्हा एकदा केला .
Post Views:
57