कोपरगावात गोदावरी लहान पूल पाण्याखाली, तालुक्यातील कोळ नदीचा पूल वाहून गेला

कोपरगावात गोदावरी लहान पूल पाण्याखाली, तालुक्यातील कोळ नदीचा पूल वाहून गेला

Godavari small bridge under water in Kopargaon, Kol river bridge in taluka washed away

कोपरगाव एक कोपरगावात १२८ मिलिमीटर पावसाची नोंद,नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल ९० हजार क्युसेसने विसर्ग 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun28 Sap19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे कोपरगाव येथील लहान पूल (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतू) पाण्याखाली गेल्याने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, धरणांमधून पाणी सोडल्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल ९० हजार क्युसेसने विसर्ग सुरु असल्याने कोपरगाव गोदावरी नदीला  पूर आला आहे, तालुक्यातील भोजडे येथील कोळ नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे पलीकडच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.

भोजडे कोळ नदीवरील पूल वाहून गेला

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून (जसे की गंगापूर, दारणा)  गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून लहान पुलाच्या वरतून पाणी गेल्याने नदीकाठच्या उपनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतुकीवरही अंशतः परिणाम झाला आहे.नदीकाठच्या वस्त्या, शेतजमिनी व पूरग्रस्त भाग धोक्याच्या झोनमध्ये आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहावे, तसेच सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन तहसील प्रशासन व पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोपरगाव शहरातील उपनगरात पाणी शिरले

गोदावरीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कोपरगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण असून, धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page