खरेदी आपल्याच गावात करा, आणि आपलीच बाजारपेठ फुलवा” -रेणुका कोल्हे 

खरेदी आपल्याच गावात करा, आणि आपलीच बाजारपेठ फुलवा” -रेणुका कोल्हे 

“Shop in your own village, and grow your own market” -Renuka Kolhe

समता सहकार बास्केट’चा स्थानिक ऑनलाइन शॉपिंग ॲपचा शुभारंभ,

युवकांसाठी खास सवलत, आकर्षक बक्षिसांची रेलचेल 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon29 Sap16.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करून आपल्या गावातील व्यापाराला आणि बाजारपेठेला चालना द्या, ज्यामुळे गाव अधिक समृद्ध होईल. यामुळे गावातील लहान व्यापारी आणि बाजारपेठ दोघेही विकसित होतील.  यासाठी खरेदी आपल्या गावातच करा, आणि बाजारपेठ फुलवा”  असे आवाहन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केले. समता सहकार बास्केट’ या स्थानिक ऑनलाइन शॉपिंग ॲपवर युवकांसाठी खास सवलत, आकर्षक बक्षिसांची रेलचेल या सर्व योजना कौतुकास्पद असून यामुळे निश्चितच बाजारपेठ फुलेलं आणि गतिशील होईल असेही त्या म्हणाल्या आहेत.,अध्यक्षस्थानी समता उद्योग समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे हे होते. 

सोमवारी(२९) रोजी सकाळी समता पतसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित “ग्राहक सन्मान योजना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सौ. रेणुका कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते “समता सहकार बास्केट’ या स्थानिक ऑनलाईन ॲप चा शुभारंभ करण्यात आला.

सौ.रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रँड अँबेसिडर असलेला “लोकल फोर व्होकल’ हा नारा खरा करण्यासाठी गावातून वस्तू खरेदी केल्याने गावातील दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मदत मिळते. जेंव्हा लोक स्थानिक बाजारातून खरेदी करतात, तेंव्हा त्याने बाजारपेठेत वस्तूंची उपलब्धता आणि विविधता वाढवते, ज्यामुळे बाजारपेठ अधिक फुलते.  स्थानिक बाजारात खरेदी केल्याने गावातील पैसा गावातच राहतो, ज्यामुळे गावातील आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत होते. यामुळे गावातील नागरिक एकमेकांना जोडले जातात आणि त्यांच्यात सामाजिक सलोखा वाढतो. बाजारपेठ फुलण्यासाठी संजीवनी ने कायम हातभार लावलेला आहे यापुढेही सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी काका कोयटे म्हणाले, गेल्या सहा वर्षापासून आम्ही गावाच्या बाजारपेठेला फुलवण्यासाठी प्रयत्न करत आहोत सातत्याने त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी ग्राहक असलेल्या युवक वर्गाला आकर्षित करण्यासाठी  ३५ वर्षांच्या युवकांसाठी योजना आणलेली आहे यासाठी संजीवनी विद्यापीठ असेल संत जनार्दन स्वामी महाविद्यालय असेल यांनी याचा प्रचार करण्यासाठी युवा  विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची परवानगी द्यावी. शहरातील उपनगरातील नागरिकांना बक्षीस मिळावे यासाठी तेथील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी प्रचार प्रसार करावा. ग्रामीण भागातील नागरिकांनी किराणा सामान, भाजीपाला किंवा इतर आवश्यक वस्तू आपल्या गावातील दुकानांमधून खरेदी करण्याचा प्रयत्न करा..शक्य असल्यास, ऑनलाइन खरेदी करण्याऐवजी गावातील व्यापाऱ्यांकडून खरेदी करा.आपल्या मित्र आणि नातेवाईकांनाही गावातील बाजारपेठेत खरेदी करण्यास प्रोत्साहित करा. “गाव तिथे खरेदी करा,’ या संकल्पनेला साथ द्या, असे आवाहन शेवटी कोयटे यांनी केले.

यावेळी संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे  अध्यक्ष चांगदेव कातकडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, मंदार पहाडे, विरेन बोरावके, वैभव गिरमे, कृष्णा आढाव, संदीप देवकर, राजश्री गुजराथी ,सौ किरण डागा, सौ पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले. असोसिएशन यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब उपाध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील  गंगुले,यांनी देखील याबाबत मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले तर शेवटी आभार औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर यांनी मांनले.

Leave a Reply

You cannot copy content of this page