स्मार्ट सिटी बरोबर कोपरगाव – शिर्डी ही ट्विन सिटी ची संधी गमावली – सौ रेणुका कोल्हे
Kopargaon and Shirdi have missed the opportunity of being twin cities with Smart City – Mrs. Renuka Kolhe
एकटा संजीवनी उद्योग समूहाकडून १०० कोटीची उलाढाल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon29 Sap16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : येथील राजकीय अनिश्चेमुळे म्हणा किंवा श्रेयाच्या भीतीपोटी स्मार्ट सिटी घालवली परिणामतः कोपरगाव- शिर्डी ही ट्विन सिटी ची(जुळी शहरे) संधी देखील गमावली असल्याचा जोरदार आरोप संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे यांनी आमदार काळे यांचे नाव न घेता येथील एका कार्यक्रमात केला.
सौ. रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या, समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने आपल्या तालुक्याला स्मार्ट सिटी मिळत होती परंतु राजकीय दूरदृष्टी म्हणा की श्रेयाच्या भीतीपोटी विरोध केल्याने ती स्मार्ट सिटी गेली परिणामतः शिर्डी कोपरगाव ट्विन सिटी ची(जुळी शहरे) योजना बारगळली. कोपरगाव शैक्षणिक व सांस्कृतिक ऐतिहासिक पौराणिक वारसा असलेले पवित्र गोदाकाठ लाभलेले धार्मिक शहर, समृद्धी महामार्ग दिल्ली बेंगलोर महामार्ग मध्यवर्ती शहर तर दुसरीकडे जागतिक कीर्तीचे साई देवस्थान लाभलेले शिर्डी शहर या दोन्ही जुळ्या शहरांनी राज्यासह देशातील मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करून आणि विविध उद्योगांना प्रोत्साहन दिले असते, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या असत्या. आर्थिकदृष्ट्या एकत्र येऊन, दोन शहरांचा मोठी बाजारपेठ तयार झाली असती , ज्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करणे सोपे होते. दोन्ही शहरांना एकत्रित सेवा आणि पायाभूत सुविधांचा फायदा मिळाला असता. प्रशासकीय खर्च कमी होऊन, एकाच प्रशासकीय यंत्रणेद्वारे दोन्ही शहरांची कार्ये पार पाडली असती. परंतु हे सर्व आपण केवळ राजकीय अनिइच्छेपोटी व श्रेयांच्या भीतीपोटी हे सर्व घालविले असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
त्यापुढे म्हणाले आपल्या गावची बाजारपेठ आर्थिक सक्षम गतिमान होण्यासाठी दळणवळणाच्या सोयीसाठी चांगले रस्ते, रोजगाराच्या संधी व सुरक्षितता अर्थात भयमुक्त वातावरण याची गरज असते परंतु दुर्दैवाने कोपरगाव मतदार संघात चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत अत्यंत वाईट अवस्था आहे दुसरी गोष्ट होऊ घातलेली एमआयडीसी कोपरगाव तालुक्यात परंतु कोपरगाव पासून लांब त्यामुळे रोजगाराच्या संधीच्या अशा धूसुर, काल परवा झालेली दगडफेक, पोलिसांवरील हल्ले म्हणजे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसून येते त्यामुळे रस्ते नाही, रोजगार नाही, आणि भयमुक्त वातावरण नाही, मग कोपरगावची बाजारपेठ कशी फुलणार ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. संजीवनी उद्योग समूह कोपरगाव च्या बाजारपेठेसाठी कारखाना, शैक्षणिक संस्था, कॉल सेंटर अशा विविध माध्यमातून १०० कोटी ची मदत करतो. लवकरच बायो सीएनजी यांच्या माध्यमातून आणखी आर्थिक ताकद देणार आहे त्यातून खरेदीची पावर वाढणार आहे असे असताना केवळ एकट्यानेच याचा विचार करून चालणार नाही यासाठी सगळ्यांनी व्यापारी म्हणून एकत्रित येऊन येथील बाजारपेठ गतिमान करण्यास मदत केली पाहिजे संजीवनीची मदत आहेच यापुढेही राहील अशी आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी समता उद्योग समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, मंदार पहाडे, विरेन बोरावके, वैभव गिरमे, कृष्णा आढाव, संदीप देवकर, राजश्री गुजराथी ,सौ किरण डागा, सौ पाठक, सुधीर डागा, राजकुमार बंब नारायणशेठ अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, सचिव प्रदीप साखरे केशव भवर आधीच मान्यवर उपस्थित होते.
Post Views:
44





