ए आय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार – आ. आशुतोष काळे

ए आय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार – आ. आशुतोष काळे

Will start courses based on AI technology – MLA Ashutosh Kale

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी ५४ वी वार्षिक  सभा 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon29 Sap18.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:शासनाच्या बदलत्या धोरणाचा विचार करून ए आय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू मानस आमदार आशुतोष काळे यांनी गौतम स्कूल मध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना व्यक्त केला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोक काळे होते.

प्रारंभी स्व. शंकरराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी दिवंगत झालेले सभासद, मान्यवर  हितचिंतक,  कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
आ. काळे म्हणाले की, नफ्याऐवजी उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करणे हा कर्मवीर शंकरराव काळे यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. सर्व सुविधायुक्त असे मुलींचे हॉस्टेल ही कामे सुरू आहेत. एका दिवसात प्रवेश पूर्ण होतात हे आपल्या शाळेच्या उच्च शैक्षणिक दर्जाचे धोतक आहे

संस्थेचे विश्वस्त कारभारी आगवण म्हणाले की, स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे गौतम पब्लिक स्कूलवर अत्यंत जीवापाड प्रेम होते.  स्कूलची शिस्त, स्कूलच्या माईज  गार्डनमुळे दिसणारा सुंदर परिसर मन भारावून टाकतो.  प्राचार्य नूर शेख यांनी आभार मानून व साहेबांचा तसेच सर्व संस्था सदस्यांचा  विश्वास निश्चितपणे  पूर्ण करू अशी ग्वाही दिली. संस्थेचे हेडक्लर्क केशव दळवी यांनी अहवाल वाचन केले

याप्रसंगी व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त कारभारी आगवण, सचिव सौ.चैताली काळे,  सिकंदर चॉद  पटेल, भास्करराव आवारे,  बाबासाहेब कोते, दिलीप चांदगुडे, सुनील बोरा, मधुकर बडवर, डॉ.चंद्रशेखर आव्हाड,  अशोक मुरलीधर काळे, मच्छिंद्र रोहमारे,  मच्छिंद्र देशमुख,  ज्ञानदेव  मांजरे , अक्षय काळे,  प्रवीण शिंदे, मधुकर घुमरे, बाळासाहेब बारहाते, अनिल बनकर, राजेंद्र निकोले,  विजय आढाव,  दिनकरराव काजळे,  अँड.नामदेवराव होन, दगुजी होन,  विलासराव वाबळे, संस्था इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे तसेच गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सौ.सुशीलामाई काळे महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निकचे प्राचार्य सुभाष भारती, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व काकडी चे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख,  बाळासाहेब गुडघे तसेच सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page