स्त्रियांचे  संस्कार हे इतरांना संस्कार देणारे – आरटीओ अनंत जोशी  

स्त्रियांचे  संस्कार हे इतरांना संस्कार देणारे – आरटीओ अनंत जोशी  

Women’s values ​​are those that give values ​​to others – RTO Anant Joshi

एस. एस. जी. एम.  कॉलेजमध्ये  नवदुर्गा हेल्मेट रॅली

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue30 Sap18.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: “स्त्रीचे वर्तन व संस्कार हे इतरांना संस्कार देणारे असून समाजाची दिशा घडवण्याचे काम यातून घडत “असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर अनंता जोशी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माधव सरोदे हे होते.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर यांच्या संयुक्तविद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आरटीओ अनंत जोशी हे बोलत होते.

या रॅलीसाठी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.एन. बी. गलांडे, सहाय्यक परिवहन निरीक्षक .श्रीम. निकिता पानसरे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर  अनंता जोशी हे उपस्थित होते.

पोलीस सब इन्स्पेक्टर गलांडे यांनी, “प्रवासाविषयी आणि अपघात टाळण्याविषयी मार्गदर्शन सूचना केल्या”. श्रीम. निकिता पानसरे यांनी, “निश्चित उद्दिष्टापर्यंत सुखरूप पोहोचणे म्हणजे सुरक्षित प्रवास आहे, असे सांगून आज भारतामध्ये दररोज हजार अपघात होतात. हे टाळवायचे असेल तर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे” असे सांगितले.

संदीप निमसे यांनी, “हिंदू धर्मानुसार पुरुष देवतांना दोन आणि चार हात आहेत, पण स्त्री देवतांना अधिक अनेक हात आहे, कारण स्त्री एकाच वेळेस अनेक कार्य करत असते व तिच्या भूमिका ही अनेक असतात, अनेक नात्यांना धरून ती वावरत असते, हे त्या मागचे गृहीतक आहे.” असे यावेळी स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “महिला शिकल्यातर सर्व समाज शिकतो, त्यामुळेमहिला स्क्षर करणे अत्यावश्यक आहे, आज समाजातील सर्व वर्गांना दिशा देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे काम महिला करत आहेत.” असे ठामपणे सांगितले.

प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले,  यावेळी  उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत,  उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत,  सर्व प्राध्यापक  विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्रा. बाळू वाघमोडे यांनी केले. सदर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा दाभाडे यांनी केले आणि आभार प्रा. महेश दिघे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page