कोपरगाव वैजापूर रस्त्याचे काम दर्जेदार करा : माजी आ. स्नेहलता कोल्हे
कार्यकर्त्यांनो ४ कोटी रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवा,
कोपरगाव :
सन २०१९-२० या अर्थसंकल्पात तरतूद करून कोपरगाव वैजापूर या दोन तालुक्यांना जोडणा-या या ८ किमी. रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी निधी मंजूर आणला. रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्यावर निधी टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे कायम दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे काम दर्जेदार करा अशी थेट तंबीच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कार्यकर्त्यांनी या कामावर लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात मतदार संघातील विविध रस्त्या साठी मोठया प्रमाणात निधी आणला. अनेक वर्षापासुन दुर्लक्षित राहिलेल्या कोपरगांव वैजापुर रस्त्याची दुरावस्था झालेली होती. शेतकरी, शाळकरी मुले, मुली, दुध उत्पादक यांनी मोठी कसरत करावी लागत होती.
मा.आ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, औरंगाबाद अहमदनगर या दोन जिल्हयांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे होते. नेहमीच दुर्लक्षीत राहिलेला
रस्ता म्हणून सातत्याने पाठपुरावा केल्याने 4 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला, या रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरणाचे काम होणार आहे. ह्या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. रस्त्याच्या कामाच्या बाबतीत तक्रार येऊ नये ग्रामस्थांनी मिळून रस्त्याचे काम दर्जेदार करून घेऊन कामावर लक्ष ठेवा.असे सौ. कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
यावेळी पढेगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ, आण्णासाहेब शिंदे, परशराम शिंदे, सुदाम शिंदे, आशोकराव तिपायले, सुदामराव कर्पे, बाबासाहेब शिंदे, विठ्ठल लंके, राजेंद्र शिंदे, दादाभाऊ शिंदे, अनिल शिंदे, वाल्मीक आहेर, सतिश पगारे, नानासाहेब गायकवाड, अशोक शिंदे आदि कार्यकर्ते, पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी कोपरगाव वैजापूर रस्त्याच्या कामाची पाहणी करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे