माजी आ स्नेहलता कोल्हे यांनी केले अनोख्या पद्धतीने कन्यादान. नवरदेव नवरीच्या हस्ते वृक्षारोपण.

माजी आ स्नेहलता कोल्हे यांनी केले अनोख्या पद्धतीने कन्यादान. नवरदेव नवरीच्या हस्ते वृक्षारोपण.

 वधूपित्याने दिली  झेडपीच्या शाळेला देणगी
कोपरगाव :
दिवसेंदिवस विवाह समारंभाच्या निमित्ताने लाखो रुपयांची अनावश्यक खर्चाची उधाळपट्टी करणे हे सर्वच वर्गात पहायला मिळत होते परंतु देशात आलेले कोरोनाचे संकटाने लग्नसमारंभ मर्यादित व्यक्तीच्या उपस्थितीत पार पडत आहे. अशाच एका विवाह समारंभात सामाजिक बांधिलकी म्हणून  माजी आ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी
नवरदेव नवरीच्या हस्ते वृक्षारोपण करून कन्यादान केले, यावेळी त्यांच्या हस्ते देविदास रोहोम या वधूपित्याने   झेडपीच्या शाळेला आर्थिक मदत  देवुन  सामाजिक दायित्वाचा  संदेश दिला.
 माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यामुळे खिर्डी गणेश येथील रोहोम कुटुंबीयांचा विवाह सोहळा पर्यावरणीय पद्धतीने   सोमवारी( दि.२९) रोजी पार पाडला. लग्न म्हटले की मंडप,बाजा वरात, धांगडधिंगा, नातेवाईकांची यांची लगभग लग्नघरी असते. याला फाटा देऊन देविदास रोहोम कुटुंबीयांनी
अत्यंत साधेपणाने , सामाजिक अंतर पाळुन उपस्थितांना मास्क, सॕनीटायझरचा वाटप करून पार पाडला. नवरदेव नवरी हस्ते वक्षरोपण करण्यात आले. इतर कुठलाही खर्च न करता  झेडपीच्या शाळेला आर्थिक मदत  केली.
माजी आ. स्नेहलता कोल्हे,
कोरोनाचे संकट, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे लहरी झालेला निसर्ग चोहीकडे अडचणीत सापडलेला शेतकरी  पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन सध्या पर्जन्यमानवरही परिणाम झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.
फोटो ओळी
 वृक्षरोपण करताना माजी आ. स्नेहलता कोल्हे व नवरदेव नवरी , पुरोहित व आप्त मंडळी .

Leave a Reply

You cannot copy content of this page