संजीवनी उद्योग समूह व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना
७२ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास (सन१९५३ते सन २०२५)
72 years of glorious history of Sanjeevani Industries Group and Cooperative Maharshi Shankarrao Kolhe Factory (1953 to 2025)
दोन प्रकल्पाचे उद्घाटन प्रगतीला चालना देणारे Inauguration of two projects to boost progress
शेतकरी सहकार मेळावा Farmers’ cooperative meeting
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 4Oct 14.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : आज केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा कोपरगावच्या संजीवनी कारखान्याला भेट देणार असून, त्यांच्या हस्ते सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे, यामुळे कारखान्याच्या प्रगतीला आणखी चालना मिळेल, या दोन प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ते शेतकरी सहकार मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करणार आहेत. हे कारखान्याच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचे सूचक ठरणार आहेत. त्या दृष्टीने घेतलेला हा आढावा.
१)जूट ज्यूस पासून इथेनॉल
इथेनॉल निर्मितीचे अनेक फायदे आहेत, ज्यात पर्यावरणाला होणारे फायदे (कमी वायू प्रदूषण, नूतनीकरणक्षम ऊर्जा), आर्थिक फायदे (ग्रामीण भागाला आर्थिक मदत, इंधन खर्च कमी), आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचे फायदे (ऊर्जा सुरक्षा) यांचा समावेश आहे. इथेनॉल हे वनस्पतींपासून तयार केले जाते आणि त्याचा वापर इंधन म्हणून तसेच औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही होतो. देशाच्या महत्वाकांक्षी इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमामुळे साखर उद्योग तयार होणार्या मळीची विल्हेवाट लावण्याची समस्या नुसती कमी झाली नाही तर, या इथेनॉलच्या पेट्रोलमधील मिश्रण करण्याने देशाने क्रुड तेल खरेदी करण्यावर खर्च होणारे बहुमूल्य परकीय चलनही वाचवले आहे.इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलमुळे होणारे देशातील कार्बन उत्सर्जन काही लाख टनांनी कमी झाले आहे.
२)शुगर फ्री’ साखर उत्पादन:
संजीवनी कारखान्याने ‘शुगर फ्री’ साखर बनविण्यास सुरुवात केली आहे. हा एक मोठा बदल आहे, कारण यामुळे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या सोयीसाठी एक नवीन उत्पादन उपलब्ध झाले आहे.
३)सीबीजी, सीएनजी बायोगॅस स्वच्छ ऊर्जा:
आज शुभारंभ होत असलेल्या प्रकल्पातून सीबीजी सीएनजी गॅसचे उत्पादन केले जाणार आहे ज्यामुळे बायो-सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलसाठी एक स्वच्छ पर्याय आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होते. शेतकऱ्यांना आणि उद्योगांना उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळेल. ही एक सुवर्णसंधी आहे. सातत्याने अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्याला मोठा हातभार लागणार असून डिझेल पेट्रोल साठी इंधन म्हणून नवीन पर्याय आहे उपलब्ध होणार आहे. स्वच्छ ऊर्जा मुळे पर्यावरणाला देखील मदत होणार आहे
४) स्पेंट वॉश ते पोटॅश
स्पेंटवॉश प्रक्रिया करुन त्यातून द्रव स्वरूपात पोटॅश मिळवून याचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि पर्यावरणाची हानी टळणार आहे
विविध क्षेत्रांतील विस्तार:
संजीवनी ग्रुपने केवळ साखर उद्योगातच नव्हे, तर मद्य, इथेनॉल, ऊर्जा, सॉल्व्हेंट्स आणि बल्क ड्रग्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्येही आपला विस्तार केला आहे, यामुळे कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीचे दर्शन घडते.
कारखान्याच्या प्रगतीवर प्रकाशझोत:स्थापन केलेल्या सहकारी संस्था
सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ मर्यादित कोपरगांव (१९५३) पुर्वीचे कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि सहजानंदनगर (१९६० कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (२९.०३.१९६१),सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखाना कामगारांची सहकारी पतपेढी, सहजानंदनगर (२५.०७.१९६४), वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, पुणे (१९.११.१९७५),अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि., शिंगणापुर (०३.१२.१९७५), नॅशनल हेवी इंजिनिअरींग लि., पुणे (१९७५), गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघ लि. ( २०.०१.१९७६), संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्था, सहजानंदनगर (२६.०७.१९७६),सुवर्ण संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि., शिंगणापुर (२०.१०.१९७६), संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (१८.०९.१९७९), संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (१९८२),संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (१५.०६.१९८४), यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि, येसगांव (१७.०७.१९८६),महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (१९८९),संजीवनी प्रि-कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल, सहजानंदनगर (१५.०९.१९९२)साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (०५.०६.१९९६),संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि., शिंगणापुर (०५.०६.१९९६),एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी (२००४),संजीवनी आयुर्वेदा कॉलेज (२०१७),संजीवनी विद्यापीठ (२०२२),सीएनजी बायोगॅस प्रकल्प (२०२५), पोटॅश प्रकल्प (२०२५) या सर्व संस्थांनी प्रकल्पामुळे संजीवनी कारखाना साखर उद्योगात आपले स्थान टिकवून आहे,
संजीवनी ग्रुपने केवळ साखर उद्योगातच नव्हे, तर मद्य, इथेनॉल, ऊर्जा, सॉल्व्हेंट्स आणि बल्क ड्रग्स या प्रकल्पासह उसाच्या सहा हजार जातींची संगोपन, विविध प्रकारचे संशोधन, संजीवनी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत अभियांत्रिकी विद्यालय संजीवनी विद्यापीठ, पीएचडी कॉलेज,फार्मसी कॉलेज, एमबीए कॉलेज, ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवनी अकॅडमी, सैनिकी स्कूल, आदिवासी आश्रम शाळा, हिरकणी दूध संघ, कॉल सेंटर, साई संजीवनी सहकारी बँक, संजीवनी सहकारी पतसंस्था, कामगार पतपेढी, शेतकरी संघ यांसारख्या विविध क्षेत्रांमध्येही आपला विस्तार केला आहे, यामुळे कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीचे दर्शन घडते.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी या संजीवनी उद्योग समूहाचा कारखान्याचा पाया घातला असून, त्यांनी सर्वांच्या समृद्धीवर विश्वास ठेवून सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाची पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणून आज संजीवनी कारखाना साखर उद्योगात आपले स्थान टिकवून आहे, आणि आता इथेनॉल ‘शुगर फ्री’ सीएनजी गॅस पोटॅश सारख्या नवीन उत्पादनांच्या माध्यमातून अधिक प्रगतीपथावर आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी या कारखान्याचा पाया घातला असून, त्यांनी सर्वांच्या समृद्धीवर विश्वास ठेवून सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाची पायाभरणी केली. त्यांची दूरदृष्टी व धाडसी वृत्तीचा परिपाक म्हणून संजीवनी उद्योग आणि आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. व त्यापुढे जाऊन काळानुरूप निर्णय घेऊन बिपिन कोल्हे यांनी आधुनिकतेची कास धरून केलेले बदल सकारात्मक ठरलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या पिढीतील युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांनी साखर कारखानदारी, सरकारी धोरण, शेतकरी व कामगार या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून आधुनिक तंत्रज्ञान आणि जगाला काय हवे या अभ्यासातून नव्या प्रकल्पांची केलेली निर्मिती म्हणून आज संजीवनी कारखाना साखर उद्योगात आपले स्थान टिकवून आहे, एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे,!
Post Views:
64