कोपरगावकरांसाठी ऐतिहासिक क्षण, सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

कोपरगावकरांसाठी ऐतिहासिक क्षण, सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

A historic moment for Kopargaon residents, to be recorded in golden letters

देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह करणार देशातील पहिला सहकारी सी बी जी प्रकल्प उद्घाटन

कोल्हे कारखाना ठरला अग्रेसर, विविध प्रकल्पांचे उद्घाटन व शेतकरी सहकार मेळावा पार पडणार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 4Oct 18.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून, उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरु झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊसप्रक्रियेतील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल निर्मिती केली जात आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून आदर्शवत वाटचाल केली आहे त्याचाच हा परिपाक मानला जातो आहे. आजच्या काळात पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यावरणपूरक आणि किफायतशीर इंधन म्हणून सीएनजीचा वापर वाढत असताना, कोपरगाव येथील हा अभिनव उपक्रम सहकार क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे. असा पथदर्शी प्रकल्प उभारणारा हा कारखाना ठरतो आहे.

दररोज १२ टन सीएनजी निर्मितीची क्षमता अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून संजीवनी उद्योग समूहाचे कारखान्यात हा अत्याधुनिक सीएनजी प्रकल्प उभारला आहे.या प्रकल्पातून दररोज १२ टन सीएनजी निर्मिती होणार असून, तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठीही हा उपक्रम वरदान ठरणार आहे.तसेच वाहतूक क्षेत्राला आर्थिक खर्च कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा होणार पुनर्वापर : कारखान्याचे सांडपाणी व डिस्टिलरी स्पेंडमधून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची ही प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरणारी आहे.

ना.अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषद सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यावतीनेही सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे.अशी माहिती कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे.

दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वा. हा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरणार आहे. यानंतर प्रत्यक्ष सीएनजी निर्मिती व विक्रीला सुरुवात होईल. हा प्रकल्प केवळ कारखान्याच्या उत्पन्नवाढीपुरता मर्यादित नसून, ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे.

चौकट – 

सर्व कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील असा ऐतिहासिक सुवर्ण क्षण ५ ऑक्टोबर रोजी कायमस्वरूपी कोपरगावच्या विकासाच्या क्रांतीत अग्रस्थानी नोंदवला जाईल अशी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी दिली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page