शिवसेनेचा ढाण्या वाघ आमचा आधारस्तंभ हरपला – राजेंद्र झावरे

शिवसेनेचा ढाण्या वाघ आमचा आधारस्तंभ हरपला – राजेंद्र झावरे

वृत्तवेध ऑनलाईन | 5 Aug 2020,
By : Rajendra Salkar, 9 : 40

कोपरगाव : शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल भैया राठोड कोपरगावच्या शिवसैनिकांशी त्यांचे मोठ्या भावाचे नाते होतं. त्यांची अधिकाऱ्यांवर जरब होती. सामान्य शिवसैनिकाच्या दुःखात धावून जाण्याची त्यांची कायम तयारी असायची त्यांच्या जाण्याने शिवसेनेचा ढाण्या वाघ, आमचा आधारस्तंभ हरपला असल्याचे भावना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केल्या,

शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते, अंत्यविधी नगर अमरधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अनिल राठोड यांना आठ दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास झालेला होता ज्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, तपासणीदरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले होते. चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनिल भैया राठोड यांच्या निधनाची बातमी कळताच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, नगरसेवक रवींद्र पाठक, शहरप्रमुख सनी वाघ, विधानसभा संघटक असलम शेख, बाळासाहेब जाधव, उपनगराध्यक्ष योगेश बागुल आदींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी शोक व्यक्त केला

.

Leave a Reply

You cannot copy content of this page