हायवेवर चेन स्नॅचर्सचा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा
वृत्तवेध ऑनलाईन।4 Augast 2020,
By: Rajendra Salkar, 20.55
कोपरगाव : मुंबई नागपूर हायवे वर डाऊच खुर्द शिवारात सोमवारी रक्षाबंधन सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नंदा सतिष काळे (वय ३५) या महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोरट्यांनी पोबारा केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काळे हे माहेगाव देशमुख येथील शेतकरी असून, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्नी नंदा व मुलगी चंचल यांच्यासह मुंबई नागपूर हायवे वरून मो.सा.क्र.एमएच- १७- अेपी -१४८२ हीवरुन झगडे फाटा कडे जात असताना पाठीमागुन काळे रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या मजबूत शरीरयष्टीच्या दोघांनी नंदा काळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून सुसाट वेगाने पलायन केले. दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या स्नॅचिंगच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सतिष मच्छिंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भरत नागरे करीत आहेत.





