नाम. अजित पवारांच्या कार्याचा अचूक वेध घेणारा ‘विकासाचा महामेरू’ गौरव ग्रंथ- ना. छगन भुजबळ
‘Vikasacha Mahameru’, a glorious book that accurately captures the work of Ajit Pawar – Na. Chhagan Bhujbal
आमदार आशुतोष काळे यांची संकल्पना
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 8 Oct 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या कार्याचा अचूक वेध घेणारा आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतील ‘विकासाचा महामेरू’ या ग्रंथातून घेण्यात आला असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी काढले.ना.अजित पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती, निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय,शेती,आरोग्य, शेती या योगदानाची वास्तव्यदर्शी मांडणी केली असल्याचे ते म्हणाले,
कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून व पत्रकार गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची विकासाभिमुख दूरदृष्टी व दैदिप्यमान कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.०७) रोजी मुंबईतील ‘हॉटेल ट्रायडंट’ येथे पार पडला या प्रसंगी ना.भुजबळ बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ना.छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आ.दिलिपराव वळसे पा., विधानसभेचे उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे, ना.बाबासाहेब पाटील,ना.माणिकराव कोकाटे, ना.दत्तात्रय भरणे, ना.मकरंद पाटील, ना.आदिती तटकरे, ना.इंद्रनील नाईक, माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, आ. शिवाजीराव गर्जे, आ.आशुतोष काळे, आ.संग्राम जगताप, आ.किरण लहामटे, आ.काशिनाथ दाते,आ.दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, कोषाध्यक्ष संजय बोरगे, पत्रकार श्रीकांत जाधव,ऋषि राऊत, महेश गिरमे तसेच राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.भुजबळ पुढे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘विकासाचा महामेरू’ या ग्रंथात अजित पवार यांची कार्यशैलीतील शिस्त, पारदर्शकता, नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या बहुआयामी कार्याचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या भक्कम योगदान व प्रेरणादायी कार्याची नोंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, विद्यमान व माजी आमदार तसेच राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:- ‘विकासाचा महामेरू’ या गौरव ग्रंथात ना. अजित पवार यांच्या कार्यशैलीतील शिस्त, पारदर्शकता, नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असून हा ग्रंथ नव्या पिढीला प्रेरणा देईल.-आ.आशुतोष काळे.
Post Views:
52





