कोपरगाव नगरपालिका  आरक्षण सोडत जाहीर, कोणाला-कोणता प्रभाग, वाचा सविस्तर?

कोपरगाव नगरपालिका  आरक्षण सोडत जाहीर, कोणाला-कोणता प्रभाग, वाचा सविस्तर?

Kopargaon Municipality announces reservation, to whom and which ward, read in detail?

कोपरगाव नगराध्यक्षपद ओबीसीसाठी खुले

कोपरगाव: कोपरगांव नगरपालिकेच्या १५ प्रभागाकरिता ३० उमेदवारांचे आरक्षण निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी/प्रशासक सुहास जगताप यांच्या उपस्थितीत बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहिर करण्यात आल्याने आगामी कोपरगाव नगरपालिका  निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण  निश्चित झाले.

कोपरगाव नगरपालिकेतील १५ प्रभागातील ३० जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. नगरपालिकेची सदस्यसंख्या ३० आहे. तर  महिलांची सदस्यसंख्या १५ एवढी झाली आहे.

राज्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारविरुद्ध महाविकास आघाडी  अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांना ८ ऑक्टोबरपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण  सोडत जाहीर  करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी ८ रोजी सकाळी सोडत प्रक्रिया पार पडली.अशावेळी राज्यातील नगरपालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया कोपरगाव पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण असे असणार आहे.

कोपरगाव नगरपालिका: एकूण द्विसदस्य प्रभाग : (१५),नगरसेवक संख्या  (३०), अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग : (०५),अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग : (०३),अनुसूचित जमाती प्रभाग संख्या: (०१), सर्वसाधारण  प्रभाग एकूण (१५ जागा), यात सर्वसाधारण महिला प्रभाग: (८जागा)

अनुसूचित जाती (महिला ३ जागा) यात प्रभाग क्रमांक – ८ अ, ११ अ, १५ अ,

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग (२जागा) प्रभाग क्रमांक – ९ अ, व २अ,
अनुसूचित जमाती (०१जागा) प्रभाग क्रमांक – २अ,
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग (१५जागा)यात प्रभाग क्रमांक – १ ब, २ ब, ३ ब, , ४ ब, ५ ब, ६ ब, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब,, ११ ब, १२ ब, १३ ब, १४ ब, १५ ब,
सर्वसाधारण साधारण महिला (८जागा)यात प्रभाग क्रमांक -२ ब,  ५ ब, ७ ब,  ९ ब, १० ब,, ११ ब, १३ ब, १४ ब

सर्वसाधारण साधारण पुरुष (प्रभाग ७ जागा ) यात प्रभाग क्रमांक – १ ब,  ३ ब, , ४ ब,  ६ ब,  ८ ब,  १२ ब, १५ ब,

प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर
१अ) जनरल महीला,१ब) जनरल पुरूष,२अ) एस सी पुरूष,२ब) जनरल महीला,३अ) ओ बी सी महीला,३ब‌)जनरल पुरूष,४अ)ओ. बी सी महीला, ४ब)जनरल पुरूष,५अ) एस टी पुरूष, ५ब) जनरल महीला,६अ)ओबीसी महीला,६ब)जनरल पुरूष,७अ) ओ बी सी पुरूष,७ब)जनरल महीला,८अ) एस सी महीला,८ब),जनरल पुरूष,९अ) एस सी पुरूष,९ब)जनरल महीला,१०अ)ओ बी सी पुरूष,१०ब) जनरल महीला,११अ)एस सी महीला, ११ब)जनरल पुरूष,१२अ)ओ बी सी महीला,१२ब)जनरल पुरूष,१३अ)ओ बी सी पुरूष,१३ब) जनरल महीला,१४अ)ओ बी सी पुरूष,१४ब)जनरल महीला,१५अ)एस सी महीला,१५ब) जनरल पुरूष

अनुसूचित जाती (महिला) प्रभाग क्रमांक – ८ अ, ११ अ, १५ अ,

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग प्रभाग क्रमांक – ९ अ, व २अ

अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक – ५अ

सर्वसाधारण आरक्षित प्रभाग (१५)‌प्रभाग क्रमांक – १ ब, २ ब, ३ ब, , ४ ब, ५ ब, ६ ब, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब,, ११ ब, १२ ब, १३ ब, १४ ब, १५ ब,

सर्वसाधारण साधारण महिला (प्रभाग ८)प्रभाग क्रमांक -२ ब,  ५ ब, ७ ब,  ९ ब, १० ब,, ११ ब, १३ ब, १४ ब,

सर्वसाधारण साधारण पुरुष (प्रभाग ७)प्रभाग क्रमांक – १ ब,  ३ ब, , ४ ब,  ६ ब,  ८ ब,  १२ ब, १५ ब,

पूर्वीचे पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष अपक्ष, कोल्हे गट(भाजपा) -१४, काळे गट राष्ट्रवादी- ०७शिवसेना- ०६, अपक्ष-०१,एकूण जागा – २८

Leave a Reply

You cannot copy content of this page