महिला बचत गटाच्या कामातून मला एक वेगळेच आत्मिक समाधान मिळते- स्नेहलता कोल्हे
I get a unique spiritual satisfaction from working with women’s self-help groups – Snehlata Kolhe
त्यांच्या वाढदिवशी बचत गटाला दोन दोन कोटी ६१ लाखाचे कर्ज वाटप
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 8Oct 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाची जडणघडण येथूनच झाली ती वाट मला विधानभवनापर्यंत घेऊन गेली. त्या महिलांना आज कर्ज वितरण करतांना मला विशेष आनंद होतो. कारण इतर कामापेक्षा बचत गटाचे काम करण्यात मला एक वेगळेच आत्मिक समाधान मिळते अशा भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केल्या.
कर्जवितरणातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे या उद्देशाने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना दोन कोटी ६१ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या कार्यकाळात महिला बचत गट चळवळीला बळकटी देत महिलांच्या आत्मनिर्भरतेचा वसा जोपासत महिलांना केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक बळ देण्याचे त्यांचे प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले होते.
संजीवनी उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो महिलांना व्यवसाय विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाचा नवा आधार मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देऊन स्वयंरोजगाराच्या संधींना नवे बळ देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
मतदारसंघात हजारो नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी कोल्हे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
Post Views:
35





