आरक्षण निश्चितीमुळे कोपरगावात इच्छुकांची धावपळ; राजकीय घडामोडींना वेग,

आरक्षण निश्चितीमुळे कोपरगावात इच्छुकांची धावपळ; राजकीय घडामोडींना वेग,

Aspirants rush to Kopargaon due to reservation confirmation; Political developments gain momentum,

वेगवेगळ्या पक्षाकडून देखील उमेदवारांची चाचपणी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir 10Oct 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव (राजेंद्र सालकर): कोपरगाव नगरपलिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण निश्चित होताच निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले अनेक इच्छुक उघडपणे मैदानात उतरले असून, त्यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला नागरिकांपुढे आणून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

कोपरगाव  नगरपलिकेच्या १५ प्रभागांचे आरक्षण बुधवारी निश्चित झाले. ३० पैकी १५ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून, नगराध्यक्ष पदही यापूर्वीच ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.

कोपरगाव नगरपालिका: एकूण द्विसदस्य प्रभाग : (१५),नगरसेवक संख्या  (३०),
अनुसूचित जाती ०५ – महिलांसाठी ०३
अनुसूचित जमाती ०१,सर्वसाधारण १६ जागा ०८ महिलांसाठी, ०८ खुल्या,ओबीसी ०८ महिलांसाठी ०४, खुल्या ०४, अशा प्रकारे प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर लागलीच मनासारखे आरक्षण निघालेल्या इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करण्यास सुरुवात केली आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता त्यांनी थेट मैदानात उडी घेतली आहे. एक प्रकारे स्वतःची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाच सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवाळी शुभेच्छांचे मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, बॅनर्स लावले गेले असून, सोशल मीडियावर उमेदवारांचे ‘ब्रँडिंग’ मोहीम सुरू झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमधून विविध घोषवाक्ये, भेटीगाठींचे फोटो, आणि जनसंपर्क मोहिमा झळकू लागल्या आहेत.

संधी हुकलेल्यांकडून पर्यायांचा शोध सुरू असून काही प्रभागात महिला ऐवजी पुरुष व पुरुष ऐवजी महिला थोडक्यात (पती-पत्नी) यांच्यातच अशी खांदेपालट करून वारसा हक्काप्रमाणे दावा कायम ठेवला आहे.
आरक्षण निश्चितीनंतर काही प्रभागातील समीकरणे बदलली आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी अवघ्या १५ जागा असल्याने इच्छुकांची सर्वाधिक संख्या असलेल्या या वर्गातील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, त्यातील काही इच्छुकांनी अगोदरच कुणबीचा पर्याय शोधून ठेवला असल्याने ओबीसीच्या आठ जागेत देखील चाचणी सुरू केली आहे. महिलांचे आरक्षण आलेल्या प्रभागात संधी हुकलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नीची उमेदवारीसमोर आणली आहे. काही जण ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत तर काही जणांनी आता पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून, दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल का, याची चाचपणी करत आहेत. काही इच्छुक द्विधा मनःस्थितीत असून, प्रतिस्पर्धी इच्छुकांची ताकद अजमावत आहेत. आपण लढविलेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी येनकेन प्रकारे अनेकांचा अट्टाहास सुरू आहे त्यामुळे नव्यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

राजकीय पक्षांनीही प्रबळ उमेदवारांची चाचपणी व शोध सुरू केला आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने व येथे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय असल्याने येथील कोणतीही निवडणूक चुरशीने लढली जाते. आरक्षण निश्चितीमुळे येथील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, निवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना आणखी वेग आला आहे.

चौकट 

भाजप (कोल्हे गट) राष्ट्रवादी (काळे गट) उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट ), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page