सत्ताधारी पक्षात आहोत… पण सत्तेवर नाही!” — विवेक कोल्हेंचा प्रहार

सत्ताधारी पक्षात आहोत… पण सत्तेवर नाही!” — विवेक कोल्हेंचा प्रहार

We are in the ruling party… but not in power!” — Vivek Kolhe’s attack

राजकीय अडथळ्यांमुळे अनेक कामांना विलंब

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue27Oct 18.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे ध्येय कोल्हे परिवाराने ठेवले असले, तरी सत्ताधारी असूनही सत्तेपासून वंचित असल्याची खंत युवा नेते विवेक  विकासाचा अजेंडा राबवला जात असतानाही राजकीय अडथळ्यांमुळे अनेक कामांना विलंब होत असल्याची टीका त्यांनी केली.  अध्यक्षस्थानी गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे होते.

राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यात विवेक कोल्हे बोलत होते. त्यांच्या सोबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, “आपण सत्ताधारी पक्षात आहोत पण सत्तेवर नाही! त्यामुळे गावोगावी विकासकामांना अडथळे येतात. तरीही आम्ही संयमाने लढतोय. योग्य वेळी न्याय मिळेल, ही खात्री पक्षश्रेष्ठींनी दिली आहे.” पंचायत समिती व जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय अडचणींवर त्यांनी थेट बोट ठेवत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मदतीने गावाच्या पाणीपुरवठा योजनेला वेग देण्याची ग्वाही दिली.

चितळी ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत विकासाची नवी पायरी गाठली असून, गावातील तळ्याचे स्वच्छीकरण, मंगल कार्यालयाचे बांधकाम, सिमेंट रस्ते व सामाजिक सुविधा यामध्ये लक्षणीय बदल झाला आहे.

विकासाचा मार्ग नेहमीच काटेरी असतो, पण कोल्हे परिवाराने  “कामातच राम आहे”  या तत्वावर काम सुरू ठेवल्याचे स्पष्ट चित्र या कार्यक्रमातून उमटले. विवेक कोल्हेंनी केलेला “सत्तेवर नाही” हा शब्दप्रहार मात्र सत्ताधाऱ्यांच्या कानावर किती पोहोचतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल!

याप्रसंगी, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधरनाना चौधरी मा. संचालक भाऊसाहेब नाना चौधरी, संचालक संपतराव चौधरी, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, दादा पाटील सांबारे,  वाकडी गावचे सरपंच बी.एल. आहेर सर, चितळी गावचे सरपंच नारायणराव कदम, बाळासाहेब  वाघ, विक्रमभाऊ वाघ, सुभाषराव तनपुरे,तुषार चौधरी,प्रकाश आरणे,योगेश बनसोडे, सुभाष कापसे, खंडेराव चव्हाण, किसनराव वाणी, वाघ सर,राजेंद्र वाणी, संभाजी गमे, ताराबाई गायकवाड, माजी सरपंच छबुराव खरात, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य चितळी, ग्रामपंचायत ग्रामसेवक,सर्व महिला भगिनी, चितळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक विक्रम वाघ यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page