रस्त्याचे काम थांबवू नका!” — आ. आशुतोष काळेंचा ठेकेदाराला थेट इशारा
Don’t stop the road work!” — A. Ashutosh Kalen’s direct warning to the contractor
पुणतांबा फाट्यावर वाहतूक कोंडी; शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे आमदार संतापले!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue27Oct 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : रविवारी (दि. २६) पुणतांबा फाट्यावर झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीतून जात असताना शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे आ. आशुतोष काळे यांनी स्वतःच्या वाहनातून उतरून थेट ठेकेदाराला फोनवरून कडक शब्दात फटकारले .
एन.एच. ७५२ जीवरील सावळीविहीर–कोपरगाव रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले असले तरी ठेकेदाराच्या धीम्या गतीमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.“काम का थांबले आहे? लोकांना रोज त्रास होतोय, काम झपाट्याने करा. अडचणी असतील तर मला सांगा, पण रस्ता आता थांबणार नाही!” अशा शब्दांत आ. काळेंनी ठेकेदाराला इशारा दिला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला असून, नागरिकांनी त्यांच्या कडक भूमिकेचे स्वागत केले आहे.
१९१ कोटी निधीतून रस्ता मार्गी, पण काम अजून अपूर्ण
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आ. काळेंच्या प्रयत्नांमुळे १९१ कोटींच्या निधीतून सुरु झाले. सावळीविहीर फाटा ते पुणतांबा फाटा या दरम्यानचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र पुणतांबा फाटा–बेट नाका या भागातील अपूर्ण कामामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
चौकट
वाहतूक कोंडी आणि अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त असताना, आ. काळेंनी ठेकेदाराला स्पष्ट शब्दांत आदेश दिले की उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे.“भू-संपादनात अडचण असेल तर थेट माझ्याशी बोला. पण आता रस्त्याचे काम थांबता कामा नये,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
Post Views:
115





