शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज द्या! – बिपीन कोल्हे

शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज द्या! – बिपीन कोल्हे

Give interest-free loans up to Rs 5 lakh to farmers! – Bipin Kolhe

कर्जाचे पुनर्गठन करा, नाहीतर सहकार कोसळेल! “शेतकरी वाचला तरच अर्थकारण टिकेल” — संजीवनीतून सरकारकडे मागणी !

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir31Oct 19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव, :अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, खरीप हंगाम वाहून गेला आणि रब्बीही धोक्यात! अशा वेळी शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज द्यावे आणि त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी ठाम मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

बिपीन म्हणाले,यंदाच्या मोसमात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले, अजुनही पाऊस थांबायला तयार नाही. रब्बी बरोबरच ऊसशेती धोक्याची झाली आहे. पावसामुळे शेतात गाळ मोठया प्रमाणांत आहे त्यामुळे अजुन पंधरा दिवस उशिरांने गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. एफआरपीच्या तुलनेत साखर विक्रीचे दर केंद्र शासनांने वाढवावे म्हणजे साखर कारखानदारांना त्यातुन काहीसा दिलासा मिळेल. उलट साखर १०० रूपयांनी खाली आली आहे. “खते, बी-बियाणे, कीटकनाशकांच्या दरवाढीने शेती खर्चिक झाली आहे.रेशनींग पद्धतीने शेतीसाठी साहित्य द्या – शासनाने आता शेतकऱ्यांसाठी खरे पाऊल उचलावे!” बिनव्याजी कर्जपुरवठा सुरू करावा. शेतकरी सावरला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशाचे अर्थकारण टिकेल.”

अध्यक्ष विवेक कोल्हे, संचालक विलासराव वाबळे, सौ. रूपाली वाबळे आदी मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकण्यात आली.
या हंगामात साडेसात ते आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी दिली.

सहकारातून शाश्वत समृद्धीचा मार्गच खरी दिशा!” – विवेक कोल्हे

“शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून त्यांची मानसिकता आंदोलनात्मक होत आहे.
सहकारातून शाश्वत समृद्धी साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजीवनीने कधीच ऊसदरात मागे न राहता शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे,” असे विवेक कोल्हे म्हणाले.आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदींने लढवुन त्यात प्रत्येकांत विजय संपादन करायचा आहे असेही ते शेवटी म्हणांले.

कार्यक्रमास दत्तात्रय कोल्हे, नितीन कोल्हे,‌ गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, डॉ. एकनाथ गोंदकर, संचालक विश्वासराव महाले, त्र्यंबकराव सरोदे, पराग संधान, अरूण येवले, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, त्र्यंबकराव परजणे, आप्पासाहेब दवंगे आदीसह,संचालक, विविध संस्था प्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन संचालक मनेष गाडे यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वासराव महाले यांनी केले.

चौकट 

सहकारातून शेतकऱ्यांना नवसंजीवनी!  ‘शेतकऱ्यांसाठी आता घोषणांपेक्षा कृती हवी!-’बिपीन कोल्हे 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page