झोपडीतून डीवायएसपीपर्यंतचा प्रवास; उषा’ने उंचावला कोपरगावचा मान-” सौ. स्नेहलता कोल्हे
Journey from hut to DYSP; Usha raised the pride of Kopargaon-” Mrs. Snehlata Kolhe
सुभाषनगरातील गरीब घरातील उषा पवार झाली डीवायएसपी; ‘जिद्द आणि मेहनतीचं प्रतीक’
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat1Nov 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली सुभाषनगरातील उषा गंगाधर पवार हिने एमपीएससी परीक्षेत चमकदार यश मिळवत डीवायएसपी पद मिळवलं आहे. झोपडीतून अधिकारी बनलेल्या या मुलीच्या यशामुळे संपूर्ण कोपरगाव तालुका अभिमानाने उजळला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमात बोलताना सौ.कोल्हे म्हणाल्या, “उषा म्हणजे जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं प्रतीक आहे. तिच्या यशामागे आई अहिल्याबाई आणि भाऊ ज्ञानेश्वर यांच्या कष्टांचं फळ आहे. संभाजी महाराज पुतळ्याजवळ साफसफाई करणाऱ्या या कुटुंबाने काम करूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही. पुण्याचं फळ कधी वाया जात नाही, त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे उषा.” दाखवून दिलं की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर उज्ज्वल भविष्य घडवू शकते.”
त्या पुढे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील मुलींनी शिकून पुढे जाणं, हे स्व. शंकरराव कोल्हे यांचं स्वप्न होतं. आज उषासारख्या मुली प्रशासनात पोहोचत आहेत, हीच खरी समाजबदलाची चिन्हं आहेत. उषा आज सर्व गरीब, दिनदलितांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.”
उषाच्या यशामागे मोबाईलपासून दूर राहून सातत्याने अभ्यास करणं आणि वाचनाची आवड हे मुख्य घटक असल्याचं कोल्हेताईंनी सांगितलं. “उषासारख्या मुलींचा मार्ग आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल,” असं सांगत त्यांनी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, राजेंद्र सोनवणे, वैभव आढाव, योगेश बागुल, जितेंद्र रणशूर, दीपक पवार, दत्ता काले, संदीप देवकर, वैभव गिरमे, गोपीनाथ गायकवाड,सागर आहेर, आदित्य पवार, फकीर मोहम्मद पैलवान, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
129






