कोपरगावचा अभिमान — स्वा. जंगुशेठ अजमेरे!

कोपरगावचा अभिमान — स्वा. जंगुशेठ अजमेरे!

The pride of Kopargaon — Mrs. Jangusheth Ajmere!

स्वातंत्र्य, समाजकारण आणि जनसेवेचा अखंड प्रवास — जंगुबाबांच्या कार्याचा सुवर्ण ठसा आजही जिवंत!

“राजकारण माझं ध्येय नव्हतं… समाजकारण हीच माझी साधना होती.” — स्वा. जंगुशेठ अजमेरे

Politics was not my goal… Social work was my practice.” — Mr. Jangusheth Ajmere

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon3Nov 16.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगावच्या भूमीला असंख्य थोर पुरुषांनी गौरवलं, पण त्या सर्वांमध्ये स्वातंत्र्यसैनिक जंगुशेठ अजमेरे हे नाव एक वेगळं तेज घेऊन उभं राहतं. लोक त्यांना प्रेमाने “जंगुबाबा” म्हणायचे. समाजकारण, लोकसेवा आणि प्रामाणिकतेचा अविरत झरा म्हणजे त्यांचं आयुष्य.

दीडशे वर्षांपूर्वी अजमेरे परिवार कोपरगावात स्थायिक झाला. जैन समाजातील हा परिवार अल्पसंख्याक असला तरी समाजात एक आदर्श ठरला. छगनीरामजी आणि जमनाबाई यांच्या पोटी जन्मलेले जंगुशेठ बालपणापासूनच धाडसी आणि क्रियाशील होते. खेळ, पोहणे, समाजसेवा या सगळ्यात त्यांची ऊर्जा ओसंडून वाहायची. अल्पसंख्याक असूनही त्यांनी समाजात आपली ओळख निर्माण केली. या कुटुंबातूनच जन्माला आले जंगुशेठ, लहानपणापासून धाडसी, उत्साही आणि समाजकार्याची ओढ असलेले.

१९४२ मध्ये गांधीजींच्या ‘चले जाव’ आंदोलनाने देश पेटला आणि कोपरगावातूनही स्वातंत्र्याची मशाल उंचावली. या लढ्यात जंगुशेठ अग्रभागी होते. “भारत माता की जय” हा त्यांचा घोष आणि देशसेवेचा मंत्र होता. या आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना आठ महिने तुरुंगवास भोगावा लागला, पण विचारांचा जाज्वल्य ज्वालामुखी अधिकच पेटला.

स्वातंत्र्यानंतर कोपरगावच्या भूमीवर पहिला ध्वजारोहण सोहळा जंगुशेठ अजमेरे यांच्या हस्तेच झाला. त्यानंतर १९४८ ते १९५७ असे सलग नऊ वर्ष  नगराध्यक्ष म्हणून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला.

त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव नगरपालिकेची भव्य इमारत, सिमेंटचे रस्ते, नगरपालिका दवाखाना, पाणीपुरवठा योजना, शिक्षण संस्था, या सर्व कामांनी शहराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या पत्नींनीही सुमारे ११ वर्ष नगरपालिकेच्या  उपाध्यक्षपदावरून जनसेवेचा वारसा पुढे नेला.

“जंगुशेठ म्हणजे लोकसेवेचं प्रतीक, प्रामाणिकतेचा आदर्श आणि विकासाचा मार्गदर्शक दीप.त्यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते एक तेजस्वी, माणुसकीने ओथंबलेलं व्यक्तिमत्व ; कोपरगावचा खरा सूर्य!

लोकप्रिय माजी नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी जंगड उत्तमचंद अजमेरे चौक नामकरण व फलक अनावर सोहळ्याच्या निमित्ताने

“ते गेले… पण त्यांचं कार्य आजही प्रत्येक कोपरगावकराच्या  मनात आहे. आज या चौकाच्या नामकरणामुळे त्याला निश्चितच उजाळा मिळाला व पुढच्या पिढीसाठी सतत प्रेरणादायी राहील! -” राजेंद्र सालकर

Leave a Reply

You cannot copy content of this page