बिबट्यांची दहशत, खड्ड्यांचा कहर — स्नेहलता कोल्हेंची वनमंत्र्यांकडे आर्त मागणी!
Terror of leopards, havoc of potholes — Snehlata Kolhe’s urgent demand to the Forest Minister!
कोल्हेंची मागणीवर वनमंत्र्याकडून लवकरच उपाययोजना शक्य
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue4Nov 17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव मतदारसंघात जनतेचा श्वास अक्षरशः अडला आहे! एकीकडे बिबट्यांच्या वाढत्या हालचालींनी लोकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांनी प्रवास म्हणजे जिवावर बेतणं झालंय. या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांची व्यथा ऐकून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी थेट संपर्क साधून तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त व रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांच्या भयावह घटना घडल्या आहेत. कधी आई मुलाला वाचवते, कधी आजोबा नातवाला, तर कधी मुलगा आईला वाचवतो… अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगांनी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ऊसतोडणी हंगामामुळे शेतं ओस पडली असून, त्यामुळे या बिबट्यांचा वावर आता गावांत वाढतोय. लहान मुलं, महिला आणि शेतमजूर अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
दरम्यान, रस्त्यांची अवस्था इतकी बिकट की माणूस वाचवतानाही जीव जातोय! नुकत्याच नगर–मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर एका गृहस्थांचा हृदयविकाराने मृत्यू झाला कारण दवाखान्यात पोहोचायलाच उशीर झाला, तोही खराब रस्त्यांमुळे!
“जनतेचे प्राण वाचवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांपासून आणि खड्ड्यांच्या हालअपेष्टेतून लोकांना मुक्त करा,” अशी भावनिक मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली असून त्यांच्या या भूमिकेचं नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.
Post Views:
99





