काळेंच्या पाठपुराव्याला यश; विजेचा प्रकाश नागरीकांच्या चेहऱ्यावर!
Success in the pursuit of Kales; electric light on the faces of citizens!
नवीन रोहित्रांसाठी मंजुरी; विजेच्या ताणातून सुटका
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue4Nov 17.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विजेचा कमी दाब, वारंवार होणारे खंडित पुरवठे आणि वाढलेला लोड यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी थेट आमदार आशुतोष काळे यांच्याकडे प्रतिनिधित्व केले. नागरिकांच्या व्यथा ऐकल्यानंतर काळे यांनी तत्काळ महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या समस्येचा सखोल आढावा घेतला.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर संबंधित भागात नवीन वीज रोहीत्रांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या रोहीत्रांची बसवणी सुरू होणार आहे. या निर्णयामुळे विजेचा ताण कमी होऊन खंडित पुरवठ्याच्या त्रासातून नागरिकांना दिलासा मिळेल. व्यापारी, शालेय विद्यार्थी, गृहिणी आणि शेतकरी वर्गात यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ. काळे यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक मोठी समस्या सुटली असून त्यांच्या कार्यक्षम व जनसंपर्कशील भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. परिसरातील आता खऱ्या अर्थाने समस्या सुटल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
Post Views:
95





