‘जनतेचा जिव्हाळ्याचा नेता’ — आ. आशुतोष काळे यांच्या कार्याचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून गौरव

जनतेचा जिव्हाळ्याचा नेता’ — आ. आशुतोष काळे यांच्या कार्याचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून गौरव

‘People’s beloved leader’ — MLA Ashutosh Kale’s work praised by Agriculture Minister Dattatreya Bharane

अहिल्यानगरच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आमदाराकडे उपमुख्यमंत्री अजीतदादांचे विशेष प्रेम — कोळपेवाडीतील कर्मवीर कृषी महोत्सवात कौतुकाचा वर्षाव

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat8Nov 18.00Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :“माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळं आकर्षण आहे. या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेला विनम्रपणा आणि प्रामाणिकपणा अप्रतिम आहे. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्य, गोरगरीबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हे काम मनापासून करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आशुतोष काळे,” असं थेट कौतुक कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मा. खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

भरणे म्हणाले, “२०१९ पासून मी आशुतोषच्या कामाची पद्धत पाहतो आहे. एखादं काम पूर्ण करायचं म्हणजे चिकाटी, सातत्य आणि जबाबदारी याचं जिवंत उदाहरण म्हणजे आशुतोष. तो फक्त मंत्र्यांनाच नाही, तर पी.ए., सचिव, एसीएसपर्यंत भेटून काम पूर्ण करतो. शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचून तो मतदारसंघाचा प्रत्येक प्रश्न सोडवतो. त्यामुळेच विकासकामांसाठी मोठा निधी मिळवण्यात तो यशस्वी ठरला आहे.”

“राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना जाहीर व्हायच्या आधीच आशुतोषच्या कामांची यादी तयार असते. कोणतं काम कोणत्या योजनेत बसवायचं आणि निधी कुठून उचलायचा याचं अचूक गणित त्याच्याकडे असतं. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. दादा त्याला ‘लाडका आमदार’ म्हणतात,” असं भरणेंनी सांगितलं.

भरणेंनी पुढे म्हटलं, “२०१९ मध्ये नवीन आमदार असतानाही आशुतोषने अशा अनेक गोष्टी करून दाखवल्या ज्या इतरांना वर्षानुवर्षे जमत नाहीत. जनतेच्या सुख-दुःखात तो नेहमी अग्रभागी असतो. लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान त्याचं खरं बक्षीस आहे. ‘हा आपला माणूस आहे’ असं मतदारांना वाटणं — हेच त्याच्या कार्याचं मोठं यश आहे.”

“आज कोपरगाव मतदारसंघाचा तो सक्षम कुटुंबप्रमुख बनला आहे. पक्षालाही त्याचा अभिमान वाटतो. आशुतोषचा पुढचा काळ नक्कीच उज्वल आहे,” असा विश्वास भरणेंनी व्यक्त केला.

चौकट 

“मतदारसंघाच्या विकासाबाबत आशुतोष काळजी करू नकोस. उपमुख्यमंत्री अजीतदादांचा तू लाडका आमदार आहेस. तुला जी काही मदत लागेल ती तुला नक्की मिळेल.”
कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे

“माझी वाशिमला पक्षाची बैठक होती. पण अजीतदादांनी फोन करूनच सांगितलं — ‘त्या बैठकीला जाऊ नकोस, पण आशुतोषच्या कार्यक्रमाला जा!’ एवढं अजीतदादांचं आशुतोषवर प्रेम आहे.”

Leave a Reply

You cannot copy content of this page