२८ विकासकामांना विरोध करणारे तुम्हीच – ठेकेदार तुमचे, भ्रष्टाचार करणारेही तुम्हीच!

२८ विकासकामांना विरोध करणारे तुम्हीच – ठेकेदार तुमचे, भ्रष्टाचार करणारेही तुम्हीच!

You are the ones opposing 28 development works – you are the contractors, you are the ones committing corruption!

आ. आशुतोष काळेंवरील आरोप म्हणजे सूर्यावर थुंकणे – सुनील गंगुले

विवेक कोल्हे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun9Nov 18.20Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:कोपरगावात विकासकामांवरून रंगलेल्या राजकीय वादात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे नेते विवेक कोल्हे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “जनतेने तुम्हाला विकासासाठी निवडून दिलं, पण तुम्हीच विकासकामांना न्यायालयीन स्थगिती मिळवून अडथळे आणलेत. आणि आता आशुतोष काळेंवर टीका करता, म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे,” अशी टीका शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली.

गंगुले म्हणाले, “२०१९ नंतर कोपरगावातील सर्व रस्ते आ. आशुतोष काळेंनी केले, पाणीप्रश्न सुटला. मात्र तुमच्या काळात काहीच झालं नाही. संगमनेर, राहाता प्रमाणे व्यापारी संकुल उभारलं असतं तर आज शहर वेगळं दिसलं असतं. पण जनतेने कायम तुमच्या दारात हेलपाटे मारावेत म्हणूनच तुम्ही विकास रोखला.”

ते पुढे म्हणाले, “पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय, आयटीआय कॉलेज यांसारख्या इमारती काळे कुटुंबाच्या प्रयत्नांनी उभारल्या. आणि तुम्ही मात्र भ्रष्टाचार करून कोपरगावचं नाव धुळीत मिळवलं.”

माजी नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले, “कोल्हेंनी चाळीस वर्ष पाणीप्रश्नावर राजकारण केलं. पण आ. आशुतोष काळे यांनी दोन महिन्यांत साठवण तलावाचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. तरी विरोधकांनी न्यायालयात जाऊन विकास रोखण्याचा प्रयत्न केला.”

युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी कोल्हेंवर हल्ला चढवत म्हटलं, “ज्यांनी जलतरण तलाव आणि ४२ कोटींची पाणी योजना ‘खाल्ली’, तेच भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण जनता सुज्ञ आहे, काम करणारा आणि खोटं बोलणारा यात फरक ओळखते.”

ते पुढे म्हणाले, “आ. आशुतोष काळे यांनी प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृहासाठी निधी दिला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीही मंजुरी मिळाली आहे. नगरपरिषदेकडे सत्ता होती, प्रशासन काम करीत नाही याला आमदार जबाबदार कसे?”

गंगुले यांनी शेवटी इशारा दिला, “आ. काळेंवर टीका कराल, तर उत्तर द्यायची आमचीही तयारी आहे. कोपरगावची जनता आता विकासाच्या बाजूने उभी आहे.”

Leave a Reply

You cannot copy content of this page