श्रीगणेश : ११ विद्यार्थीना ४४ लाखाची स्कॉलरशिप

श्रीगणेश : ११ विद्यार्थीना ४४ लाखाची स्कॉलरशिप
Inspir Scholarship

वृत्तवेध ऑनलाईन | 5 Aug 2020,
By : Rajendra Salkar, 15 : 40

कोपरगाव : श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज,कोऱ्हाळे महाविद्यालयाच्या स्कॉलरशिप साठी पात्र ठरलेल्या ११ विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी पाच वर्षासाठी ४४ लाख रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली

१२ वी नंतर विज्ञान उच्चशिक्षणासाठी शाळेच्या विज्ञान शाखेच्या एकूण लागलेल्या निकाला पैकी १० टक्के सर्वात जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर स्कॉलरशिप दिली जाते. बारावीनंतर नॅचरल व बेसिक सायन्स विज्ञान विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी ८० हजार रुपये दरवर्षी याप्रमाणे पाच वर्षासाठी प्रत्येकी एकूण चार लाख रुपये स्कॉलरशिप दिली जाते. श्री गणेशचे ११ विद्यार्थी
इन्स्पायर स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आहेत.

त्यामध्ये चौधरी रिया नानासाहेब, मकासरे हर्षल सुरेश, वास्ते बालाजी नामदेव, गाडेकर समृद्धी संजय, मेहेरखांब निकिता रमेश, जोगदंड अभय लहू, दळवी यश जयप्रकाश, धोंडे क्षेत्रज्ञ सुनील, दिघे आशिष पोपट, जाधव संदेश प्रशांत, अग्रवाल नुपुर आशिष हे विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरलेले आहेत.

या विद्यार्थ्यांनी बीएस्सी व एम एस सी या वर्गाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना इन्स्पायर स्कॉलरशिप दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, विश्वस्त भारत शेटे, राहुल वलटे, रवींद्र चौधरी, किरण भारस्कर, शाळेचे प्राचार्य प्रा. रामनाथ पाचोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रियाज शेख, उपप्राचार्य प्रा. प्रवीण दहे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर व शिक्षक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page