आठशे रुपयाची लाच घेताना महिला तलाठीस अटक
आठ दिवसांत लाच प्रकरणी दुसरा तलाठी अटक
वृत्तवेध ऑनलाईन 6 Aug 2020
By: Rajendra Salkar, 7:05
ArrestedBribenagartractor
कोपरगाव : नामनिर्देशित महसूल अधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र निर्माण केलेल्या भाराचा तपशील अधिकार अभिलेखात सामाविष्ट करण्यात यावा यासाठी तक्रारदार यांच्याकडे १०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ८००/- रुपये घेण्यास संमती देऊन ती
ज्योती वसंतराव कव्हळे, तलाठी, वर्ग-३, (३२) यांनी स्वतः स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
सदर प्रकरणी नाशिक प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने बुधवारी ५ अॉगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३,०० वाजेच्या दरम्यान येसगाव कार्यालय येथे सापळा लावला. यावेळी तलाठी ज्योती कव्हळे संबंधित शेतकऱ्याकडून आठशे रुपयाची लाच घेताना पकडल्याची माहिती चंद्रसेन पालकर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नासिक यांनी दिली आहे. तक्रारदार शेतकरी व खाजगी इसमांची नावे सांगण्यास पोलीस निरीक्षक पालकर यांनी नकार दिला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी मा.सुनिल कडासने साो., पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक. मा.निलेश सोनवणे साो., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक. सापळा अधिकारी चंद्रसेन पालकर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नासिक. सापळा पथक संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, पो.ना. वैभव देशमुख, पो.ना. प्रवीण महाजन, चालक पो.हवा. विनोद पवार, सर्व नेमणूक- ला.प्र.वि. नाशिक. आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी अहमदनगर. यांचे पथकाने ही कारवाई केली. लाच स्वीकारताना ज्योती कव्हळे यांना अटक झाली आठ दिवसात लाच स्वीकारताना दुसऱ्या तलाठ्यास अटक झाल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या





