कोपरगावात नगराध्यक्षांचे १५ तर सदस्यांचे २२१ असे २३६ अर्ज दाखल,
In Kopargaon, 236 applications were filed, including 15 for the mayor and 221 for members,
उमेदवारी अर्जांचा शेवटचा दिवशी धामधूम; राष्ट्रवादी भाजपच्या उमेदवारांची धाकधूक कायम
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 17Nov 18.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : निवडणूक प्रक्रिया सुरू होताच कोपरगावात राजकीय तापमान चांगलंच चढलं! रविवारी सुट्टी असतानाही नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या. ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास परवानगी मिळाल्याने उमेदवारांनी रविवारीही धावपळ करत अर्ज दाखल केले.
सोमवारी अर्जांची अंतिम मुदत असल्याने दिवसभर अर्ज दाखल करण्याची झुंबडच उडाली. नगराध्यक्षपदासाठी तब्बल १५ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी तब्बल २३६ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी नऊ जणांचे १५ अर्ज , कोण कुणाशी मुकाबला?
भाजपचे पराग संधान यांनी एकट्याने ४ अर्ज दाखल करत भाजपचा दम दाखवला.
अपक्ष विजय वहाडणे, दीपक वाजे व कुरेशी हिमोलीसा योगेश वाणी यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली.
शिंदे सेनेचे राजेंद्र झावरे यांनी २ अर्ज,उद्धव ठाकरे गटाच्या सपना मोरे यांचा १ अर्ज, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे काका कोयटे यांचे २ अर्ज आणि सुवासिनी कोयटे यांच्या २ अर्जांनी राष्ट्रवादीतही चांगलीच हलचल निर्माण केली आहे.
नगरसेवकपदासाठी अर्जांचा पाऊस , ३० जागांसाठी २२१ जणांची धावपळ!
शहरातील १५ प्रभागांतील ३० सदस्य जागांसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिंदे सेना, ठाकरे सेना तसेच अपक्षांकडून अशी तब्बल ११२ अर्ज रविवारीपर्यंत दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी १०९ जणांनी अर्ज दाखल केल्याने अखेरीपर्यंत हा आकडा थेट २२१ वर पोहचला.
१८ नोव्हेंबरला छाननीनंतर कोण मैदानात टिकणार हे स्पष्ट होणार आहे. १९, २०, २१ नोव्हेंबर हे तीन दिवस माघारीसाठी राखीव असून २६ रोजी अधिकृत चिन्हवाटप होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
अनामत रक्कम १.७० लाख – आजपासून आचारसंहितेची कात्री लागू!
२३६ अर्जदारांनी मिळून सुमारे १ लाख ७० हजारांची अनामत रक्कम भरली आहे. अर्ज दाखल होताच उमेदवारांवर आचारसंहितेचे नियम लागू झाल्याने उद्यापासून खर्च नोंदी ठेवण्याचे बंधन येणार आहे.छाननीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह हजर राहावे, असे आवाहन तहसीलदार सावंत यांनी केले.
या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रशासक सुहास जगताप यांनी पाहिले.
चौकट
कोपरगावात निवडणूक संग्राम पेटला आहे! अर्जांच्या या लोंढ्यांमुळे खऱ्या स्पर्धेची रंगत आता छाननीनंतरच दिसणार…
Post Views:
54





