कोपरगाव नगरपालिका निवडणूक : अर्जांचा महापूर, पक्षांतर्गत वादळे आणि आज सोमवारी होणारी जबरदस्त गर्दी! 

 कोपरगाव नगरपालिका निवडणूक : अर्जांचा महापूर, पक्षांतर्गत वादळे आणि आज सोमवारी होणारी जबरदस्त गर्दी! 

Kopargaon: Flood of applications, intra-party disputes and today’s opposition to coercion!

निवडणूक वातावरणावर टाकलेला दृष्टिक्षेप

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 17Nov 13.10Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :सोमवार, १७ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस! त्यामुळे आज कोपरगाव तहसील कचेरीत उमेदवारांची एकसारखी धावपळ, गर्दी आणि राजकीय माहोल तापणार हे निश्चित!

रविवार दुपारी ३ पर्यंत नगरसेवकांसाठी ११२ तर नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज दाखल झाले. दहा वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये उमेदवारांची नावांची चर्चा, पक्षांतर्गत चलबिचल आणि बुथ स्तरावरील समीकरणे तब्बल मागच्या आठवड्यापासून रंगात आली आहेत.

 अर्ज कमी… पण दबा धरून बसलेले दावेदार अधिक!

अनेक प्रभागांमध्ये अजूनही एकही अर्ज नाही. कारण तिकिट कोणाला मिळणार?
गटनेत्यांची रणनीती काय?शेवटच्या क्षणी कोणाला कट मारणार?याच गोंधळात बहुतांश इच्छुक ‘शेवटच्या दिवशी अर्ज’ या सुरक्षित पर्यायाची वाट पाहत आहेत.

कोल्हे गटाकडून २० जागांची घोषणा झाल्याने उर्वरित दहा जागांवर चुरस वाढली आहे. तर काळे यांनी “सर्वांनी अर्ज भरा” म्हणत गोंधळ आणखी वाढवला. त्यामुळे अनेक ठिकाणी तिकीट कोणाला मिळेल याविषयी प्रत्येक तासाला नाव बदलण्याचे राजकारण सुरूच!

पक्षांतर्गत फुट – वरवर शांतता, आत मोठं वादळ!

प्रत्येक गटात वातावरण एकच  “उमेदवारी नक्की नाही, पण नाराजी १००%!”

अनेक प्रभागांत पक्षकार्यकर्त्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या व्यक्तींना प्राधान्य दिल्याची चर्चा…अनेक ठिकाणी “तिकीट माझंच” या विश्वासाने बसलेल्यांची धास्ती…आणि काही प्रभागांत तर सरळ नाराजीचा स्फोट उडण्याची चिन्हे!

साम-दाम-दंड-भेद वापरून पक्ष नेते उमेदवारांची माघार घ्यायला लावतीलही… पण ही तात्पुरती तडजोड असेल हे स्पष्ट!
निवडणूक झाली की ही नाराजीच खरी डोकेदुखी ठरणार आहे.

 प्रचाराला फक्त साडेचार दिवस – उमेदवारांना मोठं संकट!

अंतिम यादी जाहीर झाल्यावर प्रचारासाठी फक्त ४.५ दिवस मिळणार असल्यानेउमेदवारांसमोर दोनच पर्याय प्रचार करावा की, नाराज कार्यकर्ते थोपवावेत? दोन्ही गोष्टी एकत्र करणं अवघड, त्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता जबरदस्त! निवडणुकीनंतरच झालेला कपाळ मोक्ष दिसणार

 कोपरगावात महायुती विस्कटली, महाआघाडीही दुभंगलेली

या निवडणुकीत कोपरगावातील मोठे चित्र खूपच वेगळे दिसत आहे, भाजप – राष्ट्रवादी (अजित पवार गट) – शिंदे शिवसेना : तीनही स्वतंत्र
ठाकरे शिवसेना – राष्ट्रवादी (शरद पवार गट) : आघाडीतही एकमत नाही.नगराध्यक्ष पदासाठी पक्षांचे उमेदवार -भाजप – पराग संधान,राष्ट्रवादी (अजित पवार गट) – काका कोयटे,ठाकरे शिवसेना – भरत मोरे,शिंदे गट – राजेंद्र झावरे,अपक्ष – दीपक वाजे, विजय वहाडणे आदी.

 पुढील वेळापत्रक – खरे राजकारण आता सुरू!

 १७ नोव्हेंबर : अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस, १८ नोव्हेंबर : छाननी,
१९ ते २१ नोव्हेंबर : अर्ज माघार,
२६ नोव्हेंबर : अंतिम यादी + चिन्ह
२१ नंतरच खरी लढत स्पष्ट होणार

 कोपरगावची निवडणूक ‘उमेदवारांपेक्षा नाराजींची’ ठरवणार!

या वेळची निवडणूक अतिशय वेगळी, अर्जांची संख्या कमी, पण दावेदार जास्त, प्रत्येक प्रभागात ४–५ इच्छुक,पक्षांतर्गत संघर्ष चरमसीमेवर,महायुती आणि आघाडी दोन्ही फुटलेल्या,प्रचाराला कमी वेळ,नाराजी हीच ‘कळीचा मुद्दा’त्यामुळे  निकालानंतर अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

निवडणूक कोण जिंकेल यापेक्षा कोण किती नाराजी सांभाळू शकतो. हेच खरे विजयाचे समीकरण ठरणार!

चौकट 

अखेरच्या दिवसापर्यंत पंधरा प्रभागातील ३० सदस्य उमेदवारांचे प्रभाग निहाय किती अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज दाखल झाले हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.

Leave a Reply

You cannot copy content of this page