काळे–कोल्हेंची शेवटच्या क्षणाची गुप्त चाल; बंडखोरी थांबवण्यासाठी उमेदवारीवर पडदा 

काळे–कोल्हेंची शेवटच्या क्षणाची गुप्त चाल; बंडखोरी थांबवण्यासाठी उमेदवारीवर पडदा 

Kale-Kolhe’s last-minute secret move; To stop the rebellion, the candidacy is shelved

अर्जांची गर्दी प्रचंड,नावांची घोषणा शून्य
इच्छुकांमध्ये संभ्रम, पक्षांत गुप्त रणनीतीला वेग!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 17Nov 18.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (काळे) आणि भाजप (कोल्हे) यांनी या वेळी पूर्णपणे गोपनीय रणनीती अवलंबली आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाही दोन्ही पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा न करता सर्वांना प्रतीक्षेत ठेवले. कारण एकच, बंडखोरी कोणत्याही परिस्थितीत वाढू नये.

गेल्या दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्जांची मोठी गर्दी केली होती. काही प्रभागात २ ते ६ इच्छुक असल्याने पक्षांना समन्वय साधणे कठीण होत होते. त्यामुळेच या वेळी पक्षांनी उमेदवारीची प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे हाताळली.

इच्छुकांना स्पष्ट आदेश देण्यात आला होता कीअपक्ष अर्ज नाही.पक्षाचे नाव लिहूनच अर्ज दाखल करा. काही  प्रभागांत उमेदवारी पेच निर्माण झाल्याने  पती–पत्नी या दोघांनाही  स्वतंत्र अर्ज द्यायला सांगण्यात आले.भरलेले अर्ज थेट पक्ष कार्यालयात घेण्यात आले. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळतेय, कोणाला नाही  याबद्दल कोणतीच माहिती बाहेर येऊ दिली नाही. काही ठिकाणी असंतोष वाढत असल्याने तासांवर तास नावांमध्ये बदल झाल्याची चर्चा कायम होती.

राष्ट्रवादी आणि भाजपकडून एबी फॉर्मही शेवटच्या क्षणीच देण्याचे ठरवण्यात आले आहे. मुलाखती झाल्या असल्या तरी एकाही इच्छुकाला अधिकृत उमेदवारीची खात्री दिली नाही. त्यामुळे शहरातील सर्व इच्छुकांचे लक्ष पक्षाच्या या ‘शेवटच्या क्षणाच्या निर्णयाकडे’ लागले आहे.दोन्ही पक्षांचा दावा   सर्वेक्षणात वर असलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या, लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या व्यक्तीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी.”

नगराध्यक्ष पदासाठी हा दावा रास्त असला तरी  काही प्रभागांत असंतोष उसळला आहे. काही ठिकाणी अचानक बाहेरून उमेदवार आणल्याच्या चर्चा देखील होत आहेत. एकंदर, या वेळी निवडणूक प्रक्रियेत पक्षांची मोठी खबरदारी, इच्छुकांचे वाढलेले टेन्शन आणि शहरात निर्माण झालेली ‘गुप्त सस्पेन्स’ची हवा,यामुळे कोपरगावची राजकारण रंगात आलंय. बंडखोरी क्षमेलही परंतु आत धगधगणारा लाव्हा हा शेवटचा प्रश्न मात्र तसाच उभा  काळे- कोल्हे यांची ही मास्टर रणनीती किती यशस्वी ठरणार?

 

Leave a Reply

You cannot copy content of this page