“नरभक्षकाचा नायनाट दिलासा: पण १०-१५ बिबटे अजूनही मोकाट-सुमित कोल्हेंची वनविभागाला ठणकावणी 

नरभक्षकाचा नायनाट दिलासा: पण १०-१५ बिबटे अजूनही मोकाट-सुमित कोल्हेंची वनविभागाला ठणकावणी 

“Relief from the extermination of the cannibal: But 10-15 leopards are still at large – Sumit foxes’ rebuke to the forest department”

धोका कायम, तातडीची योजना जाहीर करा!”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 17Nov 18.40Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त झाला. दिलासा मिळाला, पण भीती अजिबात संपलेली नाही! कोपरगाव तालुक्यात अजूनही १० ते १५ बिबटे मुक्त संचार करत असल्याने परिस्थिती गंभीरच असल्याचा इशारा संजिवनी ग्रुपचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिला.

येसगाव, खिर्डी गणेश परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन,शेळ्या, वासरे फाडून ग्रामीण भागात मोठे नुकसान,शेतकरी–विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे सावट कायम असल्याने कोल्हे यांनी स्पष्ट सांगितले, “नरभक्षक संपला म्हणजे संकट संपलं नाही! उर्वरित बिबटे कधी कुठे दिसतील याची शाश्वती नाही!

 पिंजरे योग्य जागी आहेत का? पुरेसे आहेत का? नागरिकांचा सवाल

वनविभागाची टीम कोपरगावातून श्रीरामपूरला परतल्याने अचानक घटना घडल्यास तातडीचा प्रतिसाद मिळणार कसा? असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केला. स्थानिक परवानाधारक बंदूकधारकांना तात्पुरते शूटर मान्यता द्या अशी मागणी देखील सुमित कोल्हे यांनी केली.

ग्रामीण भागात सायरन, ध्वनीवर्धक व बिबटे दूर ठेवणारी यंत्रणा बसवा, तातडीची प्रतिसाद पथके  २४x७ सतर्कता,पिंजऱ्यांची त्वरित तपासणी व वाढ,शेतकरी–विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम या मागण्या करतांना त्यांनी थोड्याशा उशीरानेही जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक बंदोबस्त तातडीने मजबूत करा.” असे स्पष्ट केले.

पुढे सुमित कोले म्हणाले की, नरभक्षकाचा बंदोबस्त कौतुकास्पद आहे परंतु उर्वरित बिबट्यांवर सर्व समावेशक योजना राबविणे  आवश्यक असल्याचे सांगताना आहे सुरक्षा नियोजन आणि जनजागृती यावर त्वरित भूमिका स्पष्ट करा ग्रामीण भाग हा बिबट्याच्या दहशतीखाली राहू नये अशी विनंती देखील त्यांनी शेवटी  सरकार व प्रशासनाला केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page