कोपरगावात निवडणुकीचे रणवादळ!नऊ नगराध्यक्ष १५२ नगरसेवक एकूण १६१ उमेदवार रिंगणात
Election battle rages in Kopargaon! Nine mayors, 152 corporators, total 161 candidates in fray
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 18Nov 21.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्जांच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः राजकीय धांदल, नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवारांचे तब्बल १५ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १९२ उमेदवारांचे २२२, अशा मिळून २०१ उमेदवारांचे तब्बल २३७ अर्ज निवडणूक यंत्रणेसमोर दाखल झाले होते.
१८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता छाननीला सुरुवात झाली, आणि दुपारी दोन-अडीचपर्यंत सर्व १५ प्रभागांचे अर्ज आणि नगराध्यक्ष पदाची छाननी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली.
छाननीत ५६ नामांकन अर्ज बाद १८१ नामांकन अर्ज पात्र,छाननीत ३५ नामांकन अर्ज अपात्र,२१ नामांकन अर्ज डमी ठरलेत एकूण ५६ नामांकन अर्ज बाद झाले तर १८१ अर्ज पात्र ठरले.
यामुळे मैदानात आता नऊही नगराध्यक्ष उमेदवार पात्र ठरले तर १५२ नगरसेवक उमेदवार म्हणजेच एकूण १६१ उमेदवार रिंगणात आमनेसामने आले आहेत राणीने नंतरचे चित्र स्पष्ट झालेला आहे
कोपरगावचं राजकारण आता अगदी पेटलेलं आता इथे निवडणुकीचं मैदान म्हणजे थेट राजकीय कुस्तीचं अखाडं ठरणार आहे.
माघारीसाठी १९, २०, २१ नोव्हेंबर या तीन दिवसात उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी आहे तर २६ नोव्हेंबरला अधिकृत चिन्ह वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर निवडणुकीची खरी धुमश्चक्री सुरू होणार, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
या संपूर्ण प्रक्रियेचे बारकाईने पर्यवेक्षण सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रशासक सुहास जगताप यांनी केले.
१६१ उमेदवारांची कोपरगावात राजकीय महाभिडत
कोपरगाव नगरपालिकेची लढत यंदा अतिशय तापलेली, तुफानी आणि निर्णायक ठरणार, हे निश्चित,नऊ नगराध्यक्ष उमेदवार आणि १५२ नगरसेवक उमेदवार एकूण १६१ राजकीय योद्धे एकाच रणांगणात
Post Views:
41