गुरव-पुजारी समाजाकडून भाजपा आमदार महेश लांडगे व सरकारचे मनापासून आभार-ॲड. अण्णा शिंदे

गुरव-पुजारी समाजाकडून भाजपा आमदार महेश लांडगे व सरकारचे मनापासून आभार-ॲड. अण्णा शिंदे

Heartfelt thanks to BJP MLA Mahesh Landge and the government from the Gurav-Pujari community – Adv. Anna Shinde

देवस्थान व्यवस्थेत गुरव–पुजारी समाजाचे ‘अधिकाराचे स्थान’ निश्चित; मंत्रिमंडळाच्या मोठ्या निर्णयाला समाजाचे कृतज्ञ अभिवादन!”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 19Nov 14.250Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :महाराष्ट्रातील देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनात गुरव, पारंपरिक पुजारी, मानकरी आणि सेवेकरी समाजाला ‘हितसंबंधी व्यक्ती’चा कायदेशीर दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.म्हणजेच आता हजारो देवस्थाने, मंदिर ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांच्या व्यवस्थापनात या समाजाला अधिकारासहित प्रतिनिधित्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.

विधानसभा पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या अशासकीय सुधारणाविधेयकाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अखेर सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाकाळातील संकट, मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा आणि सेवेत गुरव-पुजारी बांधवांचे अनन्यसाधारण योगदान याची राज्य सरकारने दखल घेतली.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता सुधारित शासकीय विधेयक मांडण्याचा मार्ग खुला झाला असून, धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखालील सर्व देवस्थानांमध्ये गुरव-पुजारी समाजाचा सहभाग कायदेशीरपणे सुनिश्चित होणार आहे.

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सभागृहात दिलेले “देवस्थानांच्या आयुष्यभर सेवा करणाऱ्या समाजाला व्यवस्थापनात स्थान मिळालेच पाहिजे” हे आश्वासन आज प्रत्यक्षात उतरले आहे.

समाजाचा कृतज्ञतेचा स्वर

अखिल गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णा शिंदे व कार्याध्यक्ष शितल शिंदे यांनी राज्य सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा आणि पाठपुरावा करणारे आमदार महेश लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “ही दुरुस्ती म्हणजे आमच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या सेवेचा सन्मान आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

लांडगे यांची प्रतिक्रिया

“गुरव-पुजारी समाजाचा शतकानुशतकांचा सेवा-अधिकार आता कायद्याने संरक्षित होणार आहे. हजारो कुटुंबांना न्याय मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सरकारचे आभार.”- महेश लांडगे, आमदार, भाजप

हा निर्णय म्हणजे मंदिर संस्कृती जपणाऱ्या समाजासाठी न्याय, सन्मान आणि मान्यता यांचा नवा टप्पा ठरला आहे.

चौकट 

गुरव–पुजारी समाजासाठी सकारात्मक निर्णयदेवस्थान व्यवस्थेत ‘हितसंबंधी व्यक्ती’ म्हणून अधिकृत मान्यता   “मंदिरातील परंपरागत सेवेला शासनाची दाद मिळणे—ही आमच्या समाजासाठी आश्वासक आणि सन्मानाची गोष्ट आहे.”“या निर्णयामुळे देवस्थान व्यवस्थापनात समाजाचा सहभाग स्पष्ट, कायदेशीर आणि स्थिर होणार आहे. ”“पिढ्यान्‌पिढ्या मंदिरसेवा करणाऱ्या कुटुंबांसाठी हा विश्वास वाढवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.”— ॲड. अण्णासाहेब शिंदे‌ राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल गुरव समाज संघटना

Leave a Reply

You cannot copy content of this page