कोपरगावात राष्ट्रवादीची झंझावाती मोहीम; २१ नोव्हेंबरला शक्तिप्रदर्शन
NCP’s stormy campaign in Kopargaon; show of strength on November 21
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज कोपरगावात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 20Nov 19.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नगरपरिषद निवडणुकीला सुरूवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे, तर प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि कोपरगावच्या विकासाचे चेहरामोहरा बदलणारे आ. आशुतोष काळे असणार आहेत.शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणाहून हजेरी लावून शक्ती दाखवावी, असे आवाहन केले आहे.
सहा वर्षांचा विकास राष्ट्रवादीचा आत्मविश्वास बुलंद
कोपरगावात पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, शहरातील महामार्गाप्रमाणे रुंद-निर्बाध रस्ते, सुशोभीकरण, वाहतूक सुविधा, स्वच्छ शहरासाठीचे उपक्रम—अशी ठोस कामगिरी करत आ. आशुतोष काळे यांनी शहराचे चित्र पालटले. या विकासाच्या वेगाला विराम न देता पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीकडून ओमप्रकाश (काका) कोयटे यांच्यावर नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
निर्णायक टप्प्यावर राष्ट्रवादीचा दमदार शुभारंभ
शुभारंभ सोहळ्यातून शहराच्या भावी विकासाचा रोडमॅप ठेवला जाणार असून तटकरे, चाकणकर आणि आ. आशुतोष काळे यांचे मार्गदर्शन आगामी प्रचाराची दिशा ठरवणार आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष गंगूले म्हणाले, “कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे. कोपरगावात राष्ट्रवादीचं बळ किती आहे याचा आवाज २१ नोव्हेंबरलाच मैदानावरून उमटू द्या.”
Post Views:
28