मी स्टंट नाही, काम करतो” – आ. आशुतोष काळे

मी स्टंट नाही, काम करतो” – आ. आशुतोष काळे

“I don’t do stunts, I do work” – A. Ashutosh Kale

अर्धशतकाची तहान संपली;कोपरगावात ७२ कोटींच्या सिंचनकामांना मुहूर्त

जिरायती पट्ट्याला निळवंडेची धार ,  काळेंच्या ‘वर्क स्टाईल’मुळे ३६३२ हेक्टरला पाणी 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 20Nov 19.25Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: जि‍रायती भागातल्या १३ गावांची ५० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील ३६३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मनेगाव येथे पार पडले.
७२.६५ कोटींच्या दोन मोठ्या कामांमुळे कोपरगाव तालुक्यातील ९५१ हेक्टर + २६८१ हेक्टर असे विस्तीर्ण क्षेत्र सिंचनक्षम होणार आहे.

आ. काळे म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राजकारणात पोझ देण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आलोय. २०१९ मध्ये दिलेला शब्द मी आज पूर्ण करतोय. निळवंडे–उजनी प्रकल्पामुळे भूजलपातळी वाढली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला.”

ते पुढे म्हणाले, “निधी मंजुरीसाठी जयंत पाटील ते राधाकृष्ण विखे पाटील—दोन्ही काळातील पाठपुराव्यामुळेच ही कामे रुजू झाली. झगडेफाटा–वडगावपान फाटा रस्त्यावर ५ कोटींचा दुरुस्तीचा शुभारंभ झालाय आणि HAM योजनेतून मोठा प्रकल्पही मार्गी लागणार आहे.”

बिबट्याला शेड्युल-१ मधून शेड्युल-२ मध्ये हलवण्याचा प्रस्ताव शासनात असून त्यानंतर संबंधित अडचणी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट – 

काळेंचा  वार; सीडीओ, नाशिककडे डिझाईन मूल्यांकन पूर्ण  वितरिकांच्या कामासाठी आ. काळे यांनी अधीक्षक अभियंता सी.एन. माळी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे अधिकाधिक क्षेत्राला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महायुती शासन व पालकमंत्र्यांचे आभारही त्यांनी मानले.

चौकट –

“रात्री-अपरात्री पाटांवरून फिरणारा आमदार; खोट्या प्रसिद्धीने त्यांचे काम झाकता येणार नाही” – गोपीनाथ रहाणे,रहाणे म्हणाले, “निळवंडेचे पाणी आणण्यासाठी काळेंनी स्वतःच्या पैशातून जेसीबी दिली, पाटापाटांवर रात्री ११ वाजेपर्यंत धावपळ केली. चाऱ्या नसताना प्रत्येक गावात पाणी पोहोचवले. पिंपळा–मऱ्याआई बंधाऱ्याच्या जोडणीवर १८ लाख खर्च केला.

२५ नोव्हेंबरपर्यंत पूरचारी सर्वेक्षणाची वर्कऑर्डर येणार आहे. सरपंच सौ. जिजाबाई मते यांनी कागदपत्रे वेळेत दिल्याने अडथळे आले नाहीत. आमच्या जिरायती गावांत लग्नं जमतायेत—कारण पाणी आलंय. खोट्या फ्लेक्स–बातम्यांनी काळेंचे काम कधीच झाकता येणार नाही.”

Leave a Reply

You cannot copy content of this page